विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच महाराष्ट्रातले पोलीस वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेत असतात. त्यामध्ये ते प्रामुख्याने महिला, मुले यांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देत असतात. महिलांच्या आत्मरक्षणासाठी पोलिसांनी पुढाकार घेतल्याचे उदाहरण यवतमाळ मधून समोर आले. महिलांनी अत्याचाराच्या विरोधात आत्मविश्वासाने उभे राहावे. आत्मरक्षण करावे यासाठी पोलिसांनी तब्बल 6000 विद्यार्थिनींना कराटेचे प्रशिक्षण दिले.Yavatmal Police takes initiative for women’s self-defense; Karate training for 6000 female students
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यवतमाळ येथे अवधूतवाडी पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यावेळी त्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली.
ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत यवतमाळ पोलीस शालेय विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी कराटे प्रशिक्षण देत आहेत. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 6000 विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आज यातील काही विद्यार्थिनींनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समक्ष कराटेचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांच्या सहसाचे मनमोकळे कौतुक केले. या विद्यार्थिनींनी अन्य विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे कराटे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवधूतवाडी पोलीस स्टेशन, यवतमाळ येथे भेट दिली आणि यवतमाळ जिल्हा प्रशासनाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे अनावरण केले. यामध्ये सेवोत्तम पोर्टल कृषी MahaMARG समावेश होता.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी शहीद वीर जवान प्रकाश विहीरे यांच्या पत्नी सुनीता विहीरे यांना जमिनीच्या पट्ट्याचे वाटप केले. यावेळी मंत्री डॉ. अशोक उईके, मंत्री संजय राठोड आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Yavatmal Police takes initiative for women’s self-defense; Karate training for 6000 female students
महत्वाच्या बातम्या
- Prime Minister Modi : मैदानावरही ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच – भारत विजयी, पंतप्रधान मोदींनी केले भारतीय संघाचे कौतुक
- Owaisi Rally : बिहारमध्ये ओवैसींच्या रॅलीत ‘आय लव्ह मोहम्मद’चे पोस्टर्स; म्हणाले – आपल्या हक्कांसाठी राजकीय नेतृत्व मजबूत करावे लागेल
- BJP Retaliates : मातोश्रीचे खिसे झटका, किमान 20 हजार कोटी शेतकऱ्यांना द्या; भाजपचा ठाकरे गटावर पलटवार
- रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची गोदाकुटी महापुरात गेली वाहून; गोदावरी महाआरतीची उज्ज्वल परंपरा मात्र कायम!!