विशेष प्रतिनिधी
मुंबई : 2 कोटी, 1.5 कोटी 130 कोटी आणि 200 कोटी हे सगळे आकडे नेमके काय बोलतायत…?? हे कुठले आकडे आहेत…?? एवढी चढती भाजणी कशाची आहे…??, याची उत्सुकता आता मुंबईत सगळ्यांना लागली आहे.Yashwant Jadhav: 2 crores, 1.5 crores, 130 crores, 200 crores … what do these numbers mean
मुंबई महापालिकेसाठी काम करणाऱ्या 35 कंत्राटदारांवर आयकर विभागाने छापे घातले आहेत. आयकर विभागाने ही कारवाई 25 फेब्रुवारी 2022 रोजी केली होती. यामध्ये अनेक संवेदनशील पुरावे विभागाचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व कंत्राटदारांचे शिवसेनेचे पदाधिकारी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती यशवंत जाधव यांच्याशी संबंध असल्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या घरावर छापा टाकून 2 कोटी रुपयांची रोकड जप्त केली, या छाप्यांमध्ये दीड 1.5 रुपयांचे दागिनेही जप्त केले आहेत. तपास यंत्रणेची कारवाई इथेच थांबली नाही, तर 25 फेब्रुवारी 2022 रोजी आयकर विभागाने मुंबई महापालिकेसाठी काम करणाऱ्या 35 कंत्राटदारांवरही छापे घातले. यात
महापालिकेची कंत्राटे घेणारे काही कंत्राटदार, एक प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांचे जवळचे सहकारी यांच्याविरोधात शोध मोहीम केली. शोध मोहिमेत मुंबईतील एकूण 35 हून अधिक परिसरात छापे घातले आहेत. यातून अनेक संशयित कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे सापडले असून ते जप्त केले आहेत. हे जप्त केलेले पुरावे कंत्राटदार आणि त्या व्यक्ती मध्ये जवळचे संबंध असल्याचे स्पष्ट करतात. यात सुमारे 3 डझन स्थावर मालमत्तांचे तपशील सापडले असून त्यांचे मूल्य 130 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यात त्यांच्या नावावर किंवा त्यांच्या सहकारी किंवा बेनामीदारांच्या नावावर घेतलेल्या मालमत्तांचा समावेश आहे.
हवाला रॅकेटचे पुरावे
आंतरराष्ट्रीय हवाला व्यवहारात त्यांचा सहभाग असल्याचे आणि अवैधरित्या कमावलेले पैसे काही परदेशी अधिकारक्षेत्रात पाठवल्याचे पुरावेही आढळले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या बेहिशेबी रोख पावत्या आणि देयके यांचा तपशील असलेली कागदपत्रे आणि एक्सेल फायली देखील सापडल्या आहेत आणि जप्त केल्या आहेत, ज्यांची नोंद खात्याच्या नियमित पुस्तकांमध्ये नाही.
कंत्राटदारांनी दडवले 200 कोटींचे उत्पन्न
कंत्राटदारांच्या जप्त केलेल्या कागदपत्रांवरून खर्च वाढवून करपात्र उत्पन्न मोठ्या प्रमाणात दडपण्यासाठी त्यांनी अवलंबलेली कार्यपद्धती उघड होते. यासाठी उप-कंत्राट खर्चासाठी जास्त कंपन्या दाखवून पावत्या तयार करणे आणि खोट्या खर्चाचा दावा केला आहे. काही कंपन्यांकडून रोख रक्कम काढली आहे
आणि त्याचा वापर कंत्राटे देण्यासाठी आणि मालमत्तांमधील गुंतवणुकीसाठी बेहिशेबी पैसे देण्यासाठी केला आहे. या गैरप्रकारांद्वारे कंत्राटदारांनी 200 कोटी रुपयांचे उत्पन्न दडवल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. शोध मोहिमेत 2 कोटी रुपयांची अघोषित रोख रक्कम आणि 1.5 कोटी रुपये किमतीचे दागिने आतापर्यंत जप्त केले आहेत.
Yashwant Jadhav: 2 crores, 1.5 crores, 130 crores, 200 crores … what do these numbers mean
महत्त्वाच्या बातम्या
- पानशेत पूरग्रस्तांना दिलासा, जमीन मालकी हक्क देण्यास तीन वर्ष मुदतवाढ
- राज्य सरकारने ओबीसी राजकीय मागासलेपणाचा डेटा दिला नाही; मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांची माहिती
- Nawab Malik ED : नवाब मलिकांच्या ईडी कोठडीत 7 मार्च पर्यंत वाढ; पीएमएलए कोर्टाचा पुन्हा दणका!!
- मैत्रीच्या आमिषाने हनी ट्रॅपचा फास, पैसे उकळण्याचे वाढले प्रकार