• Download App
    'गंगोत्री १' शिखरावर महिला गिर्यारोहकांनी फडकवला तिरंगाWomen mountaineers hoisted the tricolor on the peak of 'Gangotri 1'

    ‘गंगोत्री १’ शिखरावर महिला गिर्यारोहकांनी फडकवला तिरंगा

    गढवाल हिमालयात गंगोत्री शिखर समूह वसलेला आहे. या समूहात गंगोत्री १, गंगोत्री २, व गंगोत्री ३ अशी तीन शिखरे आहेत.Women mountaineers hoisted the tricolor on the peak of ‘Gangotri 1’


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : गढवाल हिमालयात गंगोत्री परिसरातील ‘गंगोत्री १’ या ३ हजार ६७२ मीटर उंच शिखरावर गिरिप्रेमीच्या महिला गिर्यारोहक पूर्वा शिंदे (सिंह) आणि स्नेहा तळवटकर या दोघींनी यशस्वी चढाई केली. शिखरावर चढाई यशस्वी झाल्यानंतर त्या दोघींनी’ गंगोत्री १ ‘ वर तिरंगा फडकवला.

    गंगोत्री शिखर समूह

    गढवाल हिमालयात गंगोत्री शिखर समूह वसलेला आहे. या समूहात गंगोत्री १, गंगोत्री २, व गंगोत्री ३ अशी तीन शिखरे आहेत. त्या तीन शिखरांपैकी ‘गंगोत्री १’ हे सर्वात उंच शिखर आहे.गंगोत्री १ हे शिखर चढाईसाठी खूप कठीण आहे. ४ सप्टेंबर रोजी हे शिखर चढण्यासाठी गिरिप्रेमीच्या महिला गिर्यारोहकांचा संघ रवाना झाला होता.



    गिरिप्रेमी महिला गिर्यारोहकांचा संघ

    या मोहिमेमध्ये शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्नेहा तळवटकर, रितू चावला, डॉ. सुनीता कोळके, हेमांग तन्ना यांनी सहभाग घेतला होता.

    शिखर चढाईत मिळाले यश

    गंगोत्री १ शिखर चढताना प्रतिकूल हवामान, सततची बर्फवृष्टी, वेगवान वारे यामुळे संघाचा वेग कमी कमी होत होता आणि दुप्पट ताकदीने पुन्हा सुरवात करावी लागत होती. दरम्यान यातील काही गिरिप्रेमी महिलांना मोहिमेतून माघारी जावे लागले.

    ही मोहीम सलग २५ दिवस चालली होती . या परिस्थितीतही खूप जिद्दीने या दोन महिलांनी शिखर माथा गाठण्यात यश मिळविले. यात गिर्यारोहक पूर्वा शिंदे (सिंह) आणि स्नेहा तळवटकर या दोघींचा समावेश आहे.या मोहिमेसाठी गिरिप्रेमीचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी मार्गदर्शन केले.

    Women mountaineers hoisted the tricolor on the peak of ‘Gangotri 1’

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित