विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य महिला आयोगाच्या स्थापनेला येत्या २५ जानेवारीला २९ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने मुबई मध्ये यशवंतराव चव्हाण केंद्रातील ‘रंगस्वर सभागृहात’ २९ व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम होणार आहे. २५ जानेवारी १९९३ रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना झाली होती. रुपाली चाकणकर (अध्यक्षा, राज्य महिला आयोग) यांनी ही माहिती सांगितली. Woman commission’s Anniversary on 25th January
त्यांनी सांगितले की, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत. यासोबत महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, विधानसभा उपसभापती नीलम गोऱ्हे, महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष ज्योती ठाकरे, पोलीस महासंचालक संजय पांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यासोबत प्रियांका सावंत, निर्मला सावंत-प्रभावळकर, विजया रहाटकर, सुशिबेन शाह या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. तसेच चंद्रा अय्यंगार, अ.ना. त्रिपाठी, आस्था लूथरा, श्रद्धा जोशी, या महिला आयोगाच्या माजी सदस्य सचिव देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
महत्वाची बाब म्हणजे कार्यक्रमात राज्यभरातील महिलांसाठी टोल फ्री क्रमांकाचे अनावरण करण्यात येणार आहे. सोबतच महिला आयोगाने तयार केलेल्या कॅलेंडर व डायरीचे देखील अनावरण या दिवशी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम सोहळा कोरोनाचे सर्व निर्बंध लक्षात घेऊन ४५ लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे, असे चाकणकर यांनी कळविले.
Woman commission’s Anniversary on 25th January
महत्त्वाच्या बातम्या
- गांधीजींच्या चळवळीमुळे नव्हे, तर नेताजींच्या आझाद हिंद फौजेमुळे देश स्वतंत्र : अर्धेंदू बोस
- एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्यास तो संपूर्ण वर्गच बंद ठेवणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे
- राहुल गांधींचा पुन्हा केंद्रावर वार, म्हणाले – देशातील 4 कोटी जनतेला गरिबीत ढकलले, ‘विकास ओव्हरफ्लो, ओनली फॉर हमारे दो’
- तस्लिमा नसरीन यांचे आता सरोगसीवर प्रश्न, म्हणाल्या – पालक ‘रेडीमेड चाइल्ड’शी भावनिकरीत्या कसे जोडू शकतात?