• Download App
    Fuel Price Hike दोन महिन्यात पेट्रोल सव्वाशे रुपये तर, डिझेलच शंभरी गाठणार, तज्ज्ञांचा अंदाज|Within Two Month petrol costs will be Rs 125. Diesel alone will reach 100, experts predict

    Fuel Price Hike दोन महिन्यात पेट्रोल सव्वाशे रुपये तर, डिझेलच शंभरी गाठणार, तज्ज्ञांचा अंदाज

    वृत्तसंस्था

    पुणे : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढतील. पेट्रोल सव्वाशे रुपये तर डिझेलच्या किमती शंभरच्या पुढे जातील, असा अंदाज पेट्रोलियम क्षेत्रातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळात इंधनाचे दर कमी झाल्याचे उघड होत आहे. Within Two Month petrol costs will be Rs 125. Diesel alone will reach 100, experts predict

    एकीकडे या किमती वाढत असताना पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशनच्या  पदाधिकाऱ्यांनी वाढणाऱ्या या दरांबद्दल बोलणं बंद केले आहे.पेट्रोल आणि डिझेलचे दर कशामुळे वाढतायत याबाबत सामान्यांच्या मनात प्रश्न आहेत.



    पण सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किमंत प्रति बॅरल सत्तर रुपये आहेत. जेव्हा हे दर 120 ते 130 रुपये होते, तेव्हा पेट्रोल सत्तरच्या आसपास होतं. पेट्रोल आणि डिझेलचे हे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरांवरुन ठरत आहेत.

    त्याचा आपल्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जातोय.  मग आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला भारतात निवडणुका असल्यावरच दर कमी करायला कसं कळतं, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

    आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा निवडणुकांशी काय संबंध असं तुम्हाला वाटत असेल तर गेल्या काही दिवसांमधील या दरांमधील चढ-उतार पाहा.

    • जानेवारी महिन्यात दहा वेळा दरवाढ झाली.
    • फेब्रुवारी महिन्यात सोळा वेळा दरवाढ झाली.
    •  मात्र मार्च महिन्यात तीन वेळा दर कमी झाले आणि याच काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरू होता.
    •  एप्रिल महिन्यात देखील एकदा दरांमधे कपात झाली कारण याच काळात निवडणुका होत्या.
    •  मात्र निवडणुका संपताच मे महिन्यात तब्बल सोळा वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली.
    •  तर जून महिन्यात आतापर्यंत पाच वेळा दरांमधे वाढ झाली.

    Within Two Month petrol costs will be Rs 125. Diesel alone will reach 100, experts predict

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ