विशेष प्रतिनिधी
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करू नये, ते मागे घ्यावे अशी आग्रही मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.महामंडळाच्या कामगारांचे सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.Withdraw the suspension Of ST staff
त्यांना आर्थिक मदत करावी. आत्महत्या केलेल्याच्या कुटुंबीयांना नोकरी द्यावी. सरकारने कारवाई मागे घेण्याचा विचार करावा. अन्यथा कर्मचाऱ्यांची घर ओस पडतील, असा इशारा त्यांनी दिला. कामगारांच्या वतीने विरोधी पक्षनेते सरकार सोबत चर्चा करणार आहेत. लोक आत्महत्या करत असतील अन्याय होत असेल तर आम्ही बोलणार आहोत.
- एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घ्या
- कामगारांचे सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे
- आत्महत्या केलेल्याच्या कुटुंबीयांना नोकरी द्यावी
- अन्यथा कर्मचाऱ्यांची घर ओस पडतील
- विरोधी पक्षनेते सरकार सोबत चर्चा करणार आहे
Withdraw the suspension Of ST staff