Saturday, 10 May 2025
  • Download App
    आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने देश कृषी उत्पादनात स्वयंपूर्ण : प्रा. डॉ. अशोक ढवण 28 व्या भारतीय अन्नशास्त्रज्ञ व तंत्रज्ञ परिषदेचा समारोप|With the help of modern technology, the country is self-sufficient in agricultural production: Prof. Dr. Ashok Dhavan ,Conclusion of 28th Indian Food scientists and Technologists Conference

    आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने देश कृषी उत्पादनात स्वयंपूर्ण : प्रा. डॉ. अशोक ढवण 28 व्या भारतीय अन्नशास्त्रज्ञ व तंत्रज्ञ परिषदेचा समारोप

    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने देशाला जागतिक स्तरावर कृषी उत्पादन क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवले असल्याचे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू प्रा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. ‘इट- सेफ’ या विषयावरील परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. With the help of modern technology, the country is self-sufficient in agricultural production: Prof. Dr. Ashok Dhavan ,Conclusion of 28th Indian Food scientists and Technologists Conference

    75 वा आजादी का अमृत महोत्सव आयोजित अखिल भारतीय अन्न शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ संघटना (ए एफ एस टी आय) आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद इट- सेफ या विषयावर घेण्यात आली. परिषदेत 70 पेक्षा अधिक तज्ञ व्यक्तीने अन्नतंत्रज्ञान अन्नप्रक्रिया, अन्न सुरक्षितता व गुणवत्ता, अन्न अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, कृषी मालावरील प्रक्रिया, दूध प्रक्रिया, न्युट्रासीटीकल्स, अन्नसुरक्षा, इत्यादी विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले.



    सन 1948 पूर्वी आपल्या भारताची लोकसंख्या कमी असून सुद्धा आपल्याला विविध अन्नाच्या प्रकाराची आयात करावी लागत होती. आज लोकसंख्या एकशे तीस कोटी असून सुद्धा, आपण केवळ आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वयंपूर्ण झालो असून विविध देशांना अन्नाची निर्यात सुद्धा करत आहोत,

    यात प्रामुख्याने अन्न प्रक्रिया उद्योगाचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून स्टार्टअप व स्टॅन्ड अप इंडियाची सुरुवात झालेली असून यात सर्व भागीदारांना, जसे शेतकरी, उद्योजक यांना प्रोत्साहित केले आहे. साधारणतः वीस ते तीस टक्के काढणीपश्‍चात तंत्रज्ञानात द्वारे होणारे नुकसान आपल्याला कमी करता येऊ शकते. अशा पद्धतीचे फोरम वेळोवेळी आयोजित करण्याबाबत त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

    या मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना, कारखानदारांना व विद्यार्थ्यांना तसेच नवीन अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीसाठी फायदा होणार असल्याचे प्रतिपादन रसायन तंत्रज्ञान संस्था, जालनाचे संचालक डॉ. उदय अन्नापुरे यांनी प्रतिपादन केले.

    परिषदेत विविध क्षेत्रात होत असलेल्या संशोधनपर शोध निबंधांचे विविध तज्ञाकडून सादरीकरण करण्यात आले. अन्नप्रक्रिया उद्योगाच्या उत्पादनाचे प्रदर्शन आभासी पद्धतीने भरवण्यात आले होते. परिषदेत विविध विषयांच्या अनुषंगाने संशोधक विद्यार्थ्यांचे सादरीकरणाच्या स्पर्धा आयोजित करून, उत्कृष्ट शोधनिबंधाचे सादरीकरण करणाऱ्या संशोधकाला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

    या परिषदेच्या आयोजनाकरिता रिसेला, अरोमॅक्स क्रिएशन, चितळे डेअरी, प्रवीण मसाले, तायोकागागु (जपान) इत्यादी उद्योजकांनी प्रायोजकत्व स्वीकारले होते. परिषदेत 33 तांत्रिक सत्र झाले असून, 200 पोस्टर आणि 200 ओरल प्रेझेंटेशन झाले आहे. या परिषदेमध्ये साधारणपणे एक हजार पेक्षा अधिक अन्न शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, उद्योजक, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    परिषदेच्या समारोप प्रसंगी डॉ. उदय आन्नापुरे( संचालक, आयसीटी जालना) डॉ. अलोक श्रीवास्तव (अध्यक्ष, एएफएसटीआय) डॉ. विकाससिंग चव्हाण (मानद सचिव, एएफएसटीआय) डॉ. सुभाप्रदा निस्ताला (अध्यक्ष, ए एफ एस टीआय, मुंबई चॅप्टर) डॉ. आर पी सिंग ( चेअरमन विद्यार्थी समिती, म्हैसूर) डॉ. विजेंद्रा ( प्रमुख शास्त्रज्ञ, सीएफटीआय) इत्यादी उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रितिका जोशी यांनी केले. आभार औरंगाबाद चॅप्टरचे अध्यक्ष व परिषदेचे आयोजन सचिव डॉ. भगवान साखळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. भगवान कापसे, प्रवीण फिरके, निमंत्रक उदय नाईक, संजय कुलकर्णी, प्रा. डॉ. पराग नेमाडे, डॉ योगेश गात, प्रा डॉ सुरेश कागणे, श्री गिरीश वाहिले, श्री नागेश आलसटवार, गणेश बार्बीले यांनी प्रयत्न केले.

    With the help of modern technology, the country is self-sufficient in agricultural production: Prof. Dr. Ashok Dhavan ,Conclusion of 28th Indian Food scientists and Technologists Conference

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस