• Download App
    अजितदादांची धास्ती, बारामतीत वस्ती!! : पवारांनी गेली 10 वर्षे लक्ष न दिलेल्या बारामतीत पवार कन्या राहणार पुढचे 10 महिने!!|With the fear of defeat @ the hands of ajit pawar, supriya sule to stay in baramati for next 10 months

    अजितदादांची धास्ती, बारामतीत वस्ती!! : पवारांनी गेली 10 वर्षे लक्ष न दिलेल्या बारामतीत पवार कन्या राहणार पुढचे 10 महिने!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : शरद पवारांनी गेली 10 वर्षे लक्ष न दिलेल्या बारामतीत त्यांची कन्या मात्र पुढचे 10 महिने राहणार आहे. कारण अजितदादांची धास्ती आणि बारामतीत केली वस्ती!!, अशी खासदार सुप्रिया सुळे यांची अवस्था झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडेपर्यंत आपण 10 महिने बारामतीतच राहणार आहोत. आपली गाडी मुंबईला जाणार नाही. माझ्या नवऱ्याला आणि मुलांना मी सांगितले आहे, की बायकोला आणि आईला भेटायचे असेल तर तुम्हाला बारामतीत यावे लागेल, असे खुद्द सुप्रिया सुळे यांनी आज इंदापूर मध्ये पत्रकारांना सांगितले.With the fear of defeat @ the hands of ajit pawar, supriya sule to stay in baramati for next 10 months

    सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यातूनच त्यांनी बारामतीत अजित पवारांची किती धास्ती घेतली आहे, हेच दिसून आले.



    अजित पवारांनी शरद पवारांपासून फारकत घेतल्यापासून अपरिहार्यपणे पवारांविरोधात गांभीर्याने काम सुरू केले आहे. ते ज्या भाजपा बरोबर सत्तेत सामील झाले आहेत, त्या पक्षाच्या प्लॅनिंग नुसारच अजितदादांना बारामतीत महायुतीसाठी राजकीय पेरणी करावी लागत आहे. त्यानुसार त्यांनी बारामतीत त्यांच्या नेतृत्वाची पहिली झलक ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये दाखवून दिली. बारामती तालुक्यातील 32 ग्रामपंचायतींपैकी 29 ग्रामपंचायतींमध्ये अजितदादा गटाने शरद पवार गटावर मात करून दाखवली.

    हा खऱ्या अर्थाने पवारांच्या बारामतीतल्या राजकीय अस्तित्वाला धक्का आहे आणि यातला धोका ओळखूनच स्वतः सुप्रिया सुळे बारामतीत पुढचे 10 महिने तळ ठोकून बसणार असल्याची बातमी आहे.

    सुप्रिया सुळे यांना देखील बारामतीतल्या आपल्या नेतृत्वाची कसोटी लागलेली पाहावी लागणार आहे.

    शरद पवारांनी काही दिवसांपूर्वीच आपण गेल्या 10 वर्षांमध्ये बारामतीतल्या स्थानिक राजकारणात लक्ष घातले नाही, असे वक्तव्य केले होते. बारामतीत ग्रामपंचायती, वेगवेगळ्या सहकारी सोसायट्या किंवा अन्य संस्थांच्या स्थानिक निवडणुकांमध्ये स्थानिक पदाधिकारीच लक्ष घालत होते. आपण त्यात लक्ष घालत नव्हतो, असा दावा पवारांनी केला होता. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे मात्र पुढचे 10 महिने बारामतीत तळ ठोकून बसणार आहेत.

    या सगळ्याला फार मोठा गंभीर राजकीय अर्थ आहे. आत्तापर्यंत पवार बारामतीतील मतदारांना गृहीत धरून चालत होते. तसा त्यांचा अनुभवही होता. पवार स्वतःच्या निवडणुकीत शेवटची सभा बारामतीत घ्यायचे. सुप्रिया सुळेंच्या 2019 च्या निवडणुकीत मात्र पवारांनी बारामतीत सर्वाधिक लक्ष घातले होते, तरी देखील सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य 1 लाखांपेक्षा खाली आले होते आणि त्या फक्त 74 हजार मतांनी निवडून आल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादी अखंड होती आणि अजित पवार सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीत मॅनेजमेंट मध्ये लक्ष घालत होते.

     बहिण – भावाची खरी कसोटी

    पण आता अजित पवार शरद पवारांपासून पूर्ण वेगळे झाले आहेत. बारामती त्यांना आपलेच नेतृत्व चालते हे भाजप श्रेष्ठींना दाखवून द्यावे लागणार आहे. यासाठी सुप्रिया सुळे यांच्या विरोधातली मोर्चे बांधणी कठोर करावी लागणार आहे आणि लोकसभेतले यशच अजितदादांच्या पुढच्या तारखेला बूस्टर डोस देणारे ठरणार आहे किंवा अजितदादांची कारकीर्द मध्यावरच आटोपल्याची चिन्हे दाखविणार आहे. त्यामुळे बारामतीतला काका विरुद्ध पुतण्या हा संघर्ष खऱ्या अर्थाने तीव्र होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांना पुढचे 10 महिने बारामतीत तळ ठोकून बसावे लागणार आहे ती त्यांच्या स्वतःच्याच राजकीय अस्तित्वाची कसोटी ठरणार आहे!!

    With the fear of defeat @ the hands of ajit pawar, supriya sule to stay in baramati for next 10 months

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!