कोरोनामुळे पतीचे निधन झाल्याचा धक्का बसल्याने पत्नीने मुलासह आत्महत्या केली. कोरोना संसगार्नंतर उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच पत्नीने तीन वर्षांच्या मुलासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. दोन मुलींना मात्र घरीच ठरविले.With the death of her husband due to corona, the wife committed suicide with her youngest son, leaving two daughters at home
विशेष प्रतिनिधी
नांदेड : कोरोनामुळे पतीचे निधन झाल्याचा धक्का बसल्याने पत्नीने मुलासह आत्महत्या केली. कोरोना संसगार्नंतर उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच पत्नीने तीन वर्षांच्या मुलासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. दोन मुलींना मात्र घरीच ठरविले.
तेलंगणातून गंदम कुटुंब नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात मजुरीसाठी आले होते. मंदिराच्या पाठीमागे राहून मजुरी करत ते उदरनिर्वाह करत होते. दरम्यानच्या काळात 40 वर्षीय पती शंकर गंदम यांना कोरोनाचा संसर्ग झाला.
त्यांना लोहा येथील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु मंगळवारी उपचारादरम्यान शंकर यांनी अखेरचा श्वास घेतला.पतीच्या निधनाची बातमी समजताच पद्मा गंदम यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.
पतीच्या पश्चात जगण्याची कल्पना असह्य झाल्याने त्यांनीही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांचा मुलगा लल्ली याच्यासह पद्मा यांनी सुनेगाव येथील तलाव गाठलं. दोघी मुलींना घरी ठेवून त्यांनी मुलासह तलावात उडी घेतली.