विशेष प्रतिनिधी
भारतातील डिजिटल क्रांतीमुळे प्रत्येकाच्या मुठीत अवघ्या जगाची माहिती देणारा स्मार्टफोन आला. याचबरोबर नवनव्या शक्यतांचा, संधींचाही उदय झाला. डिजिटल क्रांतीबरोबरच सदैव अपडेट राहण्याची सवय जनमानसात रुळली. या क्रांतिकारी बदलात जनसामान्यांची ज्ञानाची, अद्ययावत माहितीची भूक भागवण्यात ऑनलाइन माध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली. With readers huge support The Focus India crossed 1 Crore mark
हजारोंच्या संख्येने माध्यमांची संकेतस्थळे सुरू झाली परंतु सातत्याअभावी बंदही पडली. अशा काळात ‘द फोकस इंडिया’ने वाचकांच्या विश्वासाच्या बळावर अल्पावधीतच मोठे यश मिळवले आहे. ऑनलाइन माध्यमांत अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा 1 कोटी व्ह्यूजचा टप्पा आम्ही तुमच्यासारख्या चोखंदळ वाचकांच्या बळावर पार केला आहे. यामुळे ही आनंद तुमच्यासोबत साजरा करणे स्वाभाविकच आहे.
विशिष्ट नॅरेटिव्ह तयार करणे, हेच अलीकडे माध्यमांचे काम झाले आहे. त्यामुळेच समोर आलेली प्रत्येक बातमी वस्तुनिष्ठ असेलच याची वाचकाला खात्री होत नाही. इथेच ‘द फोकस इंडिया’ने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. ‘द फोकस इंडिया’मध्ये फेक न्यूज नाहीत
परंतु मुख्य प्रवाहातील माध्यमांनी जाणते-अजाणतेपणे दुर्लक्ष केलेले खरे पैलू, वस्तुनिष्ठ विश्लेषण, सकारात्मक बातम्यांचा आवर्जून समावेश आहे. यामुळेच तर इतर माध्यमांच्या तुलनेत गुणवत्तेच्या आधारावर ‘द फोकस इंडिया’ हे उजवे ठरले आहे. एक कोटी व्ह्यूजचा टप्पा हेच वाचकांचे प्रेम दर्शवतो. वाचक देवो भव: अशी आमची भावना आहे. याच भावनेतून वाचकांचा प्रतिसाद, प्रतिक्रियांनाही आम्ही तेवढेच महत्त्व देतो. रास्त तक्रारींचे नेहमीच खुल्या मनाने स्वागतही करू.
आमची टॅगलाइन NO to Fake VIEWS, YES to Factual NEWS! आहे. यापुढेही आम्ही वाचकांच्या अपेक्षांवर पूर्ण उतरू हा आमचा विश्वास आहे. वाचकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल शतश: आभार. वाचत राहा thefocusindia.com!
With Readers Huge Support The Focus India Crossed 1 Crore Mark
महत्त्वाच्या बातम्या
- Mr. Dependable is Back ! श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविड टीम इंडियाचे नवे कोच
- ठाकरे सरकारला पुन्हा फटकार : Door to Door Vaccination हे सर्व पब्लिसिटीसाठी सुरु होतं का? हायकोर्टाचा संताप
- पुण्याच्या सोळा वर्षीय मुलाने टिपले चंद्राचे सुंदर आणि सुस्पष्ट छायाचित्र
- अजित पवारांसह दिग्गजांना क्लिन चिटवर संशय, शिखर बँक घोटाळा प्रकरणाती तत्काळ सुनावणीस मनाईची अण्णा हजारेंची मागणी मान्य
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी युट्यूब चॅनलमधून महिन्याला कमावतात चार लाख रुपये