प्रतिनिधी
मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान याच्याशी असलेल्या आर्थिक संबंधांवरून सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी चौकशीची चाहूल लागतात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना आपल्या कर्जत जामखेड मतदार संघातील विकासासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्याचे आठवले. With fear of ED Inquiry rohit Pawar meet eknath shinde and devendra Fadanavis
भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांनी रोहित पवारांना राकेश वाधवान याच्याशी संबंधांच्या मुद्द्यावरून सध्या टार्गेट केले आहे. भाजप नेत्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांचा यावरून उभा दावा सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील आपल्या नातवाच्या मदतीला धावले आहेत.
या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी आपल्या कर्जत जामखेड मतदार संघाच्या विकास कामांसंदर्भात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही वस्तू विदेशात आहेत त्या परत आणण्याच्या कामासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही वस्तू विदेशात आहेत त्या परत आणल्या पाहिजेत, हा मुद्दा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना महत्त्वाचा वाटला, असे रोहित पवारांनी या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले. बाकी कोणत्याही विषयावर चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले.
पण आपण पूर्वी संचालक असलेल्या ग्रीन फार्म्स कंपनीच्या ईडी चौकशीची चाहूल लागताच रोहित पवार यांना आपल्या मतदारसंघाचा विकास आठवला. त्यातली कामे आठवली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही वस्तू विदेशात असल्याचे लक्षात आले आणि म्हणून त्यांनी राजकीय मुहूर्त साधून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नेमके आजच्या दिवशी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात जाऊन पत्रकार परिषद घेऊन शिंदे फडणवीस सरकारला टार्गेट केले. आजोबा आणि नातवाच्या या राजकीय खेळीबद्दलही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
With fear of ED Inquiry rohit Pawar meet eknath shinde and devendra Fadanavis
महत्वाच्या बातम्या
- शिंदेसेनेने बदलला पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता : यशवंत जाधवांची पक्षाचे मुंबई अध्यक्ष, नवा पत्ता ठाण्याचा
- सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी : 5 न्यायाधीशांचे घटनापीठ घेणार निर्णय
- काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक १७ ऑक्टोबरला, गरज भासल्यास १९ ला मतमोजणी आणि निकाल
- Sonali Phogat : सोनाली फोगट हत्येप्रकरणी पाचवी अटक, हे चारही आरोपी आधीच पोलिसांच्या ताब्यात