• Download App
    विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन : अखेर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुहूर्त ठरला, भाजपनेही चालवली तयारी । Winter Session of the Legislature Finally, the moment came for the election of the Speaker of the Assembly, the BJP also started preparations

    विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन : अखेर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुहूर्त ठरला, भाजपनेही चालवली तयारी

    Winter Session : सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यात आधीच चर्चा सुरू असल्याप्रमाणे अखेर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुहूर्त ठरला आहे. यानुसार दि. 27 डिसेंबर रोजी अर्ज दाखल करण्यात येतील, तर 28 डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे. दरम्यान, भाजपही उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Winter Session of the Legislature Finally, the moment came for the election of the Speaker of the Assembly, the BJP also started preparations


    वृत्तसंस्था

    मुंबई : सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यात आधीच चर्चा सुरू असल्याप्रमाणे अखेर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुहूर्त ठरला आहे. यानुसार दि. 27 डिसेंबर रोजी अर्ज दाखल करण्यात येतील, तर 28 डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे. दरम्यान, भाजपही उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    शुक्रवारी विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीला महाविकासआघाडी आणि भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते.

    यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी एका आठवड्याने वाढवण्याची मागणी केली. राज्य सरकारने अद्याप अनेक प्रश्नांवर उत्तरे दिली नाहीत म्हणूनच अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

    तथापि, हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यास राज्य सरकार तयार नाही. त्यांनी कालावधी वाढवण्यास नकार दिला आहे. परिणामी, हे अधिवेशन नियोजित वेळापत्रकाप्रमाणे २८ डिसेंबरला संपणार आहे. याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूकही पार पडेल. खूप कमी कालावधीचे अधिवेशन होत असल्याने विरोधकांनी टीकेचा भडिमार केला आहे.

    Winter Session of the Legislature Finally, the moment came for the election of the Speaker of the Assembly, the BJP also started preparations

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताच्या शत्रूंसाठी मर्यादा निश्चित केली – अमित शाह

    IPL 2025 : आयपीएल २०२५चे नवीन वेळापत्रक जाहीर, १७ मे पासून सामना सुरू होणार

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानात पुन्हा ड्रोन दिसले; होशियारपूरमध्ये 5-7 स्फोट, ब्लॅकआऊट