• Download App
    खात्याविषयी प्रश्न आल्यास जेलमध्ये स्क्रिन लावणार का? प्रवीण दरेकर यांचा सवाल|Will there be a screen in the jail if there is a question about the ministry? Question by Praveen Darekar

    खात्याविषयी प्रश्न आल्यास जेलमध्ये स्क्रिन लावणार का? प्रवीण दरेकर यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी

    ठाणे: अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. परंतु नवाब मलिक हे जेलमध्ये आहेत. सत्तेवर असलेली नेतेमंडळी त्यांचा राजीनामा घेत नाही, मग अधिवेशनात त्यांच्या खातेविषयी काही प्रश्न समोर आले, तर मग काय त्यांच्यासाठी जेलमध्ये स्क्रीन लावणार का? असा सवाल भाजपचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.Will there be a screen in the jail if there is a question about the ministry? Question by Praveen Darekar

    दरेकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकार हे हुकूमशाही पद्धतीने आणि अहंकाराने भरलेले सरकार आहे. बॉम्ब स्फोटातील दाऊदच्या संबंधातील आरोपी शहावली खान आणि सलीम पटेल त्यांच्याकडून ३०० कोटीची जागा १०-१५ लाखाला विकत घेऊन नवाब मलिक यांचा संबंध आला आहे.



    हा प्रकार गंभीर असून हा प्रश्न राष्ट्रवादाचा आहे. ज्याठिकाणी देश विघातक प्रवृत्ती येतात तेव्हा ‘झुकेगा नही’ अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे या सरकारचा आहे.राज्य सरकारकडून रोज एकच आरोप केला जात आहे. परंतु, कारवाई चुकीची की बरोबर हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नसून तो न्याय व्यवस्थेला आहे.

    त्यामुळे न्यायालयीन कोठडीचे आदेश हे न्यायालयाने मालिकांना दिले असून भाजपने ते दिलेले नाहीत. केंद्रीय तपास यंत्रणा या कोणाच्या इशाऱ्यावर चालत नसतात. जेव्हा कॉंग्रेस सरकार होते त्यावेळी देखील अशा प्रकारे मंत्र्यांवर कारवाई झाल्या. धाडी पडल्या. मग त्यावेळी आम्ही काय केले? मग आता तुमच्यावर जे आरोप होतायत त्याचे उत्तर जनतेला आणि न्यायालयाला द्या,

    त्याचे खापर केंद्र सरकार, तपास यंत्रणा आणि भाजपवर कशाला फोडता?, असा सवाल दरेकर यांनी केला.लवकरच अधिवेशनाला सुरुवात होणार आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थित नवाब मलिक यांना आम्ही राजीनामा देण्यासाठी भाग पाडणार असल्याचा इशारा देत दरेकर म्हणाले, जर नवाब मलिक हे जेलमध्ये आहेत.

    त्यांच्याकडे कॉबिनेट मंत्री पद आहे. भाजप विरोधी पक्षात आहे आम्ही प्रश्न विचारला तर नवाब मलिक याचं उत्तर कुठून घ्यायचं. आमचे उत्तर मिळवण्यासाठी आम्ही जेल मध्ये जायचं की जेलमध्ये स्क्रीन लावणार का? नवाब मलिक यांच्या खात्यांच्या प्रश्नांची जबाबदारी कोण घेणार?

    Will there be a screen in the jail if there is a question about the ministry? Question by Praveen Darekar

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना

    Mumbai Municipal : मुंबईसह सर्व महापालिका निवडणुकांसाठी भाजप-शिंदेसेना युती; 15 ते 20 जानेवारीदरम्यान निवडणुका शक्य