विशेष प्रतिनिधी
मुंबई : सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ पाहता पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रति लिटर १० ते १२ रुपये दर वाढ होणार हे नक्की. पण, दर एकाच वेळी वाढवणार का दररोज २ ते ३ रुपयांनी वाढणार हे सांगता येणार नाही. ते निर्णय कंपन्या घेतील अशी प्रतिक्रिया ‘फामफेडा’चे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किंमतीमध्ये वाढ होणार हे आता स्पष्ट झाले. Will the fuel price increase suddenly or slowly?
पेट्रोलची किंमत आज वाढणार की उद्या?
पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे देशातील तेल उत्पादक कंपन्यांवर तेलाच्या किंमती न वाढवण्याचा दबाव होता. त्यामुळे तेल उत्पादक कंपन्यांना २३ ते २५ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. शेवटच्या टप्य्यातील मतदान पार पडले. त्यामुळे आता देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती १० ते १२ रुपयांनी वाढणार हे नक्की आहे. ही किंमतवाढ आता आज संध्याकाळी जाहीर होणार की उद्या याची औपचारिकता बाकी असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.
कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये उच्चांकी वाढ
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी २००८ नंतर पहिल्यांदाच सर्वोच्च पातळी गाठली आहे. ब्रेंट क्रूडचे दर १३९ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. २००८ मध्ये कच्च्या तेल दराने १४७ डॉलर प्रति बॅरल रेकॉर्ड स्तर गाठला आहे. अमेरिका आणि युरोपियन युनियन रशियन तेलाच्या आयातीवर निर्बंध लादण्याचा विचार करत आहेत.
गेल्या वर्षी ३ नोव्हेंबर २०२१ रोजी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर १० रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क ५ रुपयांनी कमी केले होते. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे दरात वाढ झाली नसल्याचे मानलं जात आहे.
Will the fuel price increase suddenly or slowly?
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यातील कोंढव्यात एनआयएकडून छापेमारी, दहशतवादी संघटनेच्या संशयितांच्या घराच्या घेतली झडती
- ममता बॅनर्जी विमान अपघातातून बचावल्या की पुन्हा एकदा आरोपांची नवटंकी
- एक्झिट पोलमध्ये पंजाबमध्ये आपच्या विजयाच्या शक्यतेने बड्या कॉँग्रेस नेत्यांना स्वत;ची चिंता, राज्यसभेची मुदत संपत असल्याने निवडून कसे यायचे हाच पेच
- काँग्रेस-राष्ट्रवादीचा शिवसेनेला कात्रजचा घाट, एकत्र निवडणूक लढवूनही पदाधिकारी निवडीत ठेवले दूर