• Download App
    हिवाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस, मुख्यमंत्री उपस्थित राहणार का ? ; विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीची उत्सुकता Will the Chief Minister be present today, the last day of the winter session? ; Curiosity for Assembly Speaker election

    हिवाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस, मुख्यमंत्री उपस्थित राहणार का ? ; विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीची उत्सुकता

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : हिवाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहणार का ? विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार का?निलंबित १२ आमदारांना मतदान करता येणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. Will the Chief Minister be present today, the last day of the winter session? ; Curiosity for Assembly Speaker election

    दरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती आदित्य ठाकरेंसह वेगवेगळ्या शिवसेना नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे ते उपस्थित राहण्याची शक्यता वाढली आहे.



    अधिवेशन आज विविध राजकीय घडामोडींनी गाजण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्धार आहे. त्यासाठी सकाळी 11 पर्यंत राज्यपालांनी उत्तर दिलं नाही तर सहमती आहे, असं समजून निवडणूक घेण्याची तयारी सत्ताधारी महाविकास आघाडीनं केली आहे.

    मात्र, त्याचे परिणाम काय होतील ? याचीही चाचपणी सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडीवरून काय घडामोडी घडत आहेत याची उत्सुकता आहे. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आम्हालाही मतदानाचा अधिकार द्या, अशी मागणी १२ निलंबित भाजप आमदारांनी राज्यपालांकडे केली आहे.

    आमचा मतदानाचा हक्का हिरावला जातोय. मतदान करणे अधिकार आहे. त्यामुळे मतदानाचा अधिकार अबाधित ठेवावा, अशी विनंती राज्यपालांकडे केली आहे.

    Will the Chief Minister be present today, the last day of the winter session? ; Curiosity for Assembly Speaker election

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस