• Download App
    Gopichand Padalkar पडळकरांच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही; फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका

    Gopichand Padalkar पडळकरांच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही; फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका

    विशेष प्रतिनिधी 

    मुंबई : Gopichand Padalkar भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानाचा सध्या संपूर्ण राज्यात तीव्र निषेध केला जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणी उघड उघड नाराजी व्यक्त केली तर काहींनी यावर पडळकरांना खडे बोल देखील सुनावले.

    मात्र आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पडळकर यांच्या वक्तव्यावर आपली नाराजी बोलून दाखवली. तसेच आम्ही अश्या कोणत्याही विधानाचे समर्थन करणार नाही असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले. Gopichand Padalkar



    काय म्हटले फडणवीस?

    पडळकरांनी केलेल्या व्यक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. त्यांनी पडळकरांना बोलताना भान राखण्याचा सल्ला दिला आहे. तसेच गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानाचे आम्ही कधीच समर्थन करणार नाही, असेही ते म्हटले.

    आज (ता. १९) पत्रकारांशी संवाद साधत असतांना फडणवीस याविषयी बोलले. ‘गोपीचंद पडळकर यांनी जे स्टेटमेंट केले ते योग्य आहे असे माझे मत नाही. कुणाच्याही वडिलांविषयी किंवा परिवाराविषयी असे बोलणे योग्य नाही. यासंदर्भात माझी पडळकरांशीही चर्चा झाली व त्यांनाही मी हेच सांगितले,’ असे फडणवीस म्हटले.

    याविषयी आणखी बोलतांना ‘या संदर्भात मला शरद पवारांचाही फोन आला होता. त्यांच्याशीही मी संवाद साधला. अशा प्रकारच्या विधानाचे आम्ही कधीच समर्थन करणार नाही. बोलताना भान राखण्याचा सल्ला मी त्यांना दिल आहे.  गोपीचंद पडळकर एक तरुण नेते आहेत. आक्रमक नेते आहेत. अनेकदा आक्रमकपणा दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत. त्यामुळे मी त्यांना सांगितले आहे की, हे लक्षात घेऊनच आपण बोलले पाहिजे. तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे. त्यामुळे आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील हे लक्षात घेऊन आपण बोलले पाहिजे, असा सल्ला मी त्यांना दिला आहे.’ असे मुख्यमंत्री म्हणाले. Gopichand Padalkar

    काय आहे पडळकरांचे ते वादग्रस्त वक्तव्य?

    भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत एकेठिकाणी बोलताना राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तसेच आमदार जयंत पाटील व त्यांच्या कुटुंबीयांविषयी वादग्रस्त विधान केले होते. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. Gopichand Padalkar

    ‘जयंत पाटील हा एक बिनडोक माणूस आहे तो दर ८ दिवसांनी आपण किती बिनडोक आहोत हे सिद्ध करतो. एका कंत्राटदाराच्या आत्महत्यच्या प्रकरणात ते मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी जतमध्ये काही माणसे पाठवली होती. त्यांच्या मार्फत त्यांनी मी एखाद्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतलेत का? याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण हा गोपीचंद पडळकर जयंत पाटलासारखा भिकाऱ्याची अवलाद नाही. हा जयंत पाटील राजराम बापू पाटील यांची अवलाद नक्की नसणार. काहीतरी गडबड आहे,’ असे ते म्हणाले होते.

    त्यांच्या या व्यक्तव्यानंतर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी पडळकरांचा समाचार घेतला. यात शरद पवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील आणि विशाल पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. आता यात स्वतः मुख्यमंत्र्यांचाही समावेश झाला आहे. त्यामुळे आता पडळकरांना हे प्रकरण चांगलच भोवणार असल्याचं दिसत आहे. Gopichand Padalkar

    Will not support Padalkar’s statement; Fadnavis clarifies his stance

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ST employees strike : दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा; प्रवाशांना होणार त्रास?

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीला स्वबळाची खुमखुमी; मागच्या दाराने पवारांच्या राष्ट्रवादीशी गुळपीठ जमवायची तयारी!!

    देवेंद्र फडणवीसांच्या गोपीचंद पडळकरांना कानपिचक्या; पण ते मोठे नेते व्हायचाही दिला दाखला; राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिरच्या झोंबल्या