• Download App
    आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ : उद्धव ठाकरे Will move to Supreme Court if speaker gives wrong decision over 16 MLAs suspension, warns Uddhav Thackeray

    आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ : उद्धव ठाकरे

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ठाकरे विरुद्ध शिंदे  सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार ११ मे २०२३ रोजी आपला निर्णय दिला. त्या निर्णयानुसार आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले मत मांडले. यावेळी त्यांनी राज्यपाल आणि शिंदे – फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले. 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला, तर आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असा इशारा त्यांनी दिला Will move to Supreme Court if speaker gives wrong decision over 16 MLAs suspension, warns Uddhav Thackeray

    – नैतिकतेला जागून राजीनामा

    मी नैतिकतेला जागून माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, मी आजही माझ्या या निर्णयावर समाधानी आहे. महाराष्ट्रात बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्ताधाऱ्यांचा खोटा चेहरा कोर्टाने उघड केला. महाराष्ट्राची अवहेलना सुरु आहे. सरकारला मिळालेलं जीवदान हे तात्पुरते असून सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अध्यक्षांनी चुकीचा निर्णय घेतल्यास आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ,असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

    उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्ला

    विश्वासघातकी लोकांचा सोबत राहून मला मुख्यमंत्रीपद नको होते आणि म्हणूनच मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. जिथे हिंदुत्व आहे तिथे नैतिकता देखील आहे. त्यामुळे आताच्या बेकायदेशीर सरकारने नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे. आपण निवडणुकीला सामोरे जावू या असे मी त्यांना आव्हान देतो. कारण जनतेचे न्यायालय हे सर्वोच्च आहे. शिंदे – फडणवीस सरकारनं जनतेला सामोरं जावं. त्यांनी जनतेचा कौल लक्षात घ्यावा. त्यांनी इतक्यात फटाके वाजवून जल्लोष करण्याची गरज नाही.

    पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार

    विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा. मात्र त्यांनी वेडावाकडा निर्णय घेतला तर आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ. ज्याप्रमाणे आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायलयात गेले होतो, त्याचप्रमाणे अध्यक्षांच्या निर्णयाविरोधातही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. मग सरकारची होणारी बदनामीला ते जबाबदार असतील.

    कायद्याच्या चौकटीत पक्षांतर करायचं हे नार्वेकरांना माहीत आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकरांना टोला लगावला आहे.

    राज्यपालांची भूमिका अत्यंत घृणास्पद

    महाराष्ट्राची बदनामी थांबली पाहिजे. सराकारनं लवकरात लवकर राजीनामा देणं गरजेचं असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आमची मागणी आहे की राज्यात लवकरात लवकर निवडणुका घ्यायला पाहिजेत ह आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. विधानसभा अध्यक्षांची निवड कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हेसुद्धा तपासणं गरजेचं असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यपालांची भूमिका अत्यंत घृणास्पद आहे. राज्यपाल ही संस्था बरखास्त करायला पाहिजे. असे ते म्हणाले. निवडणूक आयुक्त नेमण्याची सुद्धा एक प्रक्रिया पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

    पंतप्रधान मोदी यांना विनंती

    उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान यांना शिंदे – फडणवीस सरकारला राजीनामा देण्यास भाग पडण्याची विनंती केली आहे. राज्यात सध्या नंगानाच सुरु आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान म्हणून तुम्हाला ते शोभा देत नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सरकारकडून राजीनामा घ्यावा, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

    Will move to Supreme Court if speaker gives wrong decision over 16 MLAs suspension, warns Uddhav Thackeray

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, 14 जानेवारीपूर्वी 3 हजार येणार, मकरसंक्रांती-निवडणूक जुळल्याने विरोधक आक्रमक

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले- राज ठाकरे सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, वारसा नाही, उद्धव ठाकरेंवरही निशाणा

    Supriya Sule : सुळेंनी केला मोठा खुलासा- शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत जाणार का? रोहित पवार राज्यात, तर सुप्रियाताई केंद्रात मंत्री होणार का?