• Download App
    Will Marathi media able to prevent BJP Mayor in Mumbai?? फालतू बातम्यांच्या पुड्या सोडून मुंबईतल्या भाजपच्या महापौराला रोखता येणार आहे का??

    फालतू बातम्यांच्या पुड्या सोडून मुंबईतल्या भाजपच्या महापौराला रोखता येणार आहे का??

    BJP Mayor

    नाशिक : केवळ फालतू बातम्यांच्या पुड्या सोडून मुंबईतल्या भाजपच्या महापौराला रोखता येणार आहे का??, असा सवाल मराठी माध्यमांच्या वेगवेगळ्या बातम्यांमुळे समोर आला.Will Marathi media able to prevent BJP Mayor in Mumbai??

    मुंबईत शिवसेना-भाजप महायुतीने 118 जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळाविल्यानंतर महायुतीचा महापौर होणे लोकशाही प्रक्रियेनुसार अपरिहार्य आहे, तरी देखील 2019 चा महाराष्ट्रातला प्रयोग डोक्यात ठेवून मराठी माध्यमांनी आणि “पवार बुद्धीच्या” पत्रकारांनी बातम्यांच्या वेगवेगळ्या पुड्या सोडल्या. त्यामध्ये महापौर पदाच्या चक्राकार आरक्षणापासून ते हॉटेल पॉलिटिक्स पर्यंतच्या बातम्यांच्या समावेश राहिला. महापौर पदाचे चक्राकार आरक्षण लागू झाल्यानंतर मुंबईत अनुसूचित जातीचा महापौर होईल. त्यामुळे ठाकरेंच्या महापौराला पुन्हा संधी मिळेल. कारण ठाकरेंकडे अनुसूचित जातींचे दोन नगरसेवक आहेत. त्या उलट महायुती भाजप किंवा शिंदे सिनेकडे तसा एकही नगरसेवक नाही, असा दावा मराठी माध्यमांनी केला.



    – तर्कदुष्ट दावा

    पण मूळात महापौर पदाचे चक्रकार आरक्षण लागू होईल हा दावाच तर्कदृष्ट ठरला. कारण महापौर पदाची सोडत 22 जानेवारीला होईल. पण त्यापूर्वीच मराठी माध्यमांनी चक्राकार आरक्षणाच्या बातमीची पुडी सोडून ठाकरेंना अनुकूल वातावरण निर्मिती केली.

    – संजय राऊत यांची नवी पुडी

    त्याचवेळी संजय राऊत यांनी आज आणखी एक दुसरी पुडी सोडली. हॉटेल पॉलिटिक्स वर आदळआपट करून झाल्यानंतर सुद्धा शिंदे सेना बधली नाही. शिंदेंच्या नगरसेवकांनी संजय राऊत किंवा ठाकरे यांच्याकडे ढुंकूनही बघितले नाही. हे राजकीय वास्तव टोचल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपच स्वतःच्या नगरसेवकांचे फोन टॅप करताय. शिंदे सेनेकडून ब्लॅकमेलिंग सुरू आहे. शिंदे सेनेला महापौर पद रस नाही. शिंदे सेनेला मुंबईच्या स्थायी समितीत रस आहे, असा दावा करणारे वक्तव्य करून नवी पुडी सोडली. कारण राऊत यांनी आपल्या वक्तव्यासाठी कुठलेच पुरावे सादर केले नाहीत.

    – दिल्लीला कशाला करावा लागेल हस्तक्षेप??

    वर सोडलेल्या दोन पुड्या कमी पडल्या म्हणून की काय मराठी माध्यमांनी आणखी एका बातमीची पुडी सोडली. दिल्लीतल्या भाजप श्रेष्ठींनी म्हणे, राज्यातल्या भाजपच्या नेत्यांना, विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट संदेश दिला आहे, की मुंबईतल्या महापौर पदासाठी भाजपने बिलकुल तडजोड करायची नाही. पण मुंबईसह इतर सर्व महापौपदांबाबत आणि वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांबाबत भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या सगळ्यांच्या नेत्यांनी एकत्र बसून सन्मानजनक तोडगा काढावा. कुठेही विरोधकांना संधी देऊ नये, असा संदेश दिल्लीतल्या श्रेष्ठींनी म्हणे, भाजपच्या नेत्यांना दिल्याचे या बातम्यांमध्ये मराठी माध्यमांनी नमूद केले.

    – “पवार बुद्धीचा” किडा

    जणू काही असा संदेश दिल्लीतल्या भाजप श्रेष्ठींनी दिलाच नसता, तर महाराष्ट्रातले भाजपचे नेते एवढे दूधखुळे आहेत, की त्यांनी मुंबईतल्या महापौर पदाचा धावा सोडूनच दिला असता, किंवा महायुतीतल्या नेत्यांबरोबर समन्वय राखून चर्चा न करता विरोधकांना अन्यत्र संधी दिली असती!!, या असल्या खुळचट बातम्यांच्या पुड्या मराठी माध्यमांना सोडाव्याशा वाटल्या कारण त्यांच्या डोक्यात 2019 चा “पवार बुद्धीचा” किडा घुसला.

    2019 मध्ये जसा जनादेश डावलून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखले, त्याचप्रमाणे मुंबई आणि महाराष्ट्रातल्या जनादेश डावलून भाजपचा महापौर रोखून मुंबईत ठाकरेंचा महापौर करण्याचे “उद्योग” मराठी माध्यमांनी आणि “पवार बुद्धीच्या” पत्रकारांनी चालविलेत. हे तद्दन फालतू “उद्योग” आहेत.

    – मूळात हा भाजपचा अधिकार

    कारण भाजप जर 89 नगरसेवक घेऊन मुंबई महापालिकेतला सगळ्यांत मोठा पक्ष ठरला असेल, तर तो पक्ष मुंबईच्या महापौर पदावरचा अधिकार का सोडेल आणि त्यांनी का सोडावा??, एवढा साधा सवाल मराठी माध्यमांच्या डोक्यात घुसला नाही. लोकशाही प्रक्रियेनुसार बहुमताचा महापौर होणार आणि सत्ताही बहुमताचीच असणार इतके साधे गणित असताना, कुठे बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीचा विषय काढून किंवा चक्राकार आरक्षणाचा विषय पुढे रेटून शिवसेनेचा महापौर बसविणे, असले “फालतू उद्योग” मराठी माध्यमांनी आणि “पवार बुद्धीच्या’ पत्रकारांनी केले. या “फालतू उद्योगांच्या” पुष्टीसाठी वेगवेगळ्या बातम्यांच्या पुड्या सोडल्या. त्या पलीकडे या बातम्यांना कुठलीच किंमत उरलेली नाही.

    Will Marathi media able to prevent BJP Mayor in Mumbai??

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Power house Maharashtra : दावोस मध्ये पहिल्याच दिवशी १४ लाख ५० हजार कोटी गुंतवणूकींचे १९ सामंजस्य करार; महाराष्ट्रात १५ लाख रोजगार संधी!!

    Maharashtra : राज्यातील 29 मनपांतील महापौर पदाचे आरक्षण ठरवण्यासाठी गुरुवारी सोडत

    Eknath Shinde : मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार; बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला शिवसेनेचा महापौर व्हावा ही कार्यकर्त्यांची भावना – एकनाथ शिंदे