वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात वाढत चाललेला कोरोना आणि ओमायक्रोनचा धोका लक्षात घेता आगामी पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्यासह आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. Will five state elections be held in February-March ?; Election Commissioner – Health Secretary Discussion !!, Meeting again in January
आरोग्य मंत्रालयाचे हे अधिकारी तीनही निवडणूक आयुक्त आणि आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाच राज्यातील कोरोना आणि ओमायक्रोनच्या फैलावासंदर्भात माहिती दिली. जानेवारी 2022 मध्ये पुन्हा एकदा अशीच आढावा बैठक घेऊन पाच राज्यातील निवडणुकीचा निर्णय घेण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेश गोवा, उत्तराखंड आदी पाच राज्यांमध्ये फेब्रुवारी-मार्च 2022 दरम्यान विधानसभेच्या निवडणुका नियोजित आहेत. या दोन महिन्यांच्या कालावधीत नेमकी कोरोना आणि ओमायक्रोन यांच्या फैलावाची परिस्थिती या राज्यांमध्ये कशी असेल, याविषयी व्यापक विचार-विनिमय निवडणूक आयोगाने बोलावलेल्या बैठकीत झाला. देशातील कोरोना आणि ओमायक्रोन साथीची संपूर्ण माहिती आरोग्य सचिवांनी निवडणूक आयुक्तांना दिली.
याआधी निवडणूक आयोगाने पाचही राज्यांचा दौरा करून तेथील निवडणूक तयारीची पाहणी केली आहे. परंतु फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच कोरोना आणि ओमायक्रोनची तिसरी लाट परमोच्च अवस्थेत असेल, असे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विचारविनिमय करण्याची गरज निवडणूक आयोगाला वाटली आहे. कोणतीही जोखीम न घेता ही निवडणूक पार पाडणे ही आयोगाची जबाबदारी असल्याने आरोग्य मंत्रालयाकडून काही मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा ठेवली आहे. त्यानुसार आजच्या बैठकीत या मार्गदर्शक सूचनांवर देखील विचारविनिमय झाला त्यानंतर निवडणुकीसंदर्भातला अंतिम निर्णय निवडणूक आयोग जाहीर करण्याआधी जानेवारीत पुन्हा एकदा आरोग्य सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांबरोबर निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे.
Will five state elections be held in February-March ?; Election Commissioner – Health Secretary Discussion !!, Meeting again in January
महत्त्वाच्या बातम्या
- Salman Khan Birthday : ‘एकदा नाही तर तीनदा चावला विषारी साप’ ! स्वतः सलमानने सांगितला परवाचा किस्सा …
- सोन्याला आणखी झळाळी मिळणार, दर वाढण्यास पोषक वातावरण
- मोठी बातमी : बीडमधील २०० हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे स्वेच्छा मरणाची मागणी
- विधानसभा अध्यक्षांच्या “आवाजी” निवडणुकीसाठी ठाकरे – पवारांची लगीन घाई; विधीमंडळातच बोलवली कॅबिनेट बैठक!!