• Download App
    पी. ए. इनामदार यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई करीत आरोपपत्र दाखल करणार; सीबीआयची न्यायालयातमाहिती । Will file a chargesheet against Inamdar; CBI information in court

    पी. ए. इनामदार यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई करीत आरोपपत्र दाखल करणार; सीबीआयची न्यायालयातमाहिती

    नोटबंदीच्या घोषणेनंतर दि मुस्लिम को-ऑप. बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी काही अधिका-यांशी संगनमत करुन, एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांची देवाणघेवाण केल्याची तक्रार सीबीआयकदे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने २०१८ मध्ये दि मुस्लिम को-ऑप. बॅंकेच्या महाराष्ट्रातील १७ शाखांसह ३२ ठिकाणी छापेमारी करत कारवाई केली होती. या छाप्यांमधील जमा केलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली असून महत्वपूर्ण धागेदोरे मिळाल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले. Will file a chargesheet against Inamdar; CBI information in court


    विशेष प्रतिनिधी

    पुणे: नोटबंदीच्या घोषणेनंतर दि मुस्लिम को-ऑप. बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी काही अधिका-यांशी संगनमत करुन, एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांची देवाणघेवाण केल्याची तक्रार सीबीआयकदे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने २०१८ मध्ये दि मुस्लिम को-ऑप. बॅंकेच्या महाराष्ट्रातील १७ शाखांसह ३२ ठिकाणी छापेमारी करत कारवाई केली होती. या छाप्यांमधील जमा केलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली असून महत्वपूर्ण धागेदोरे मिळाल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले.

    पी. ए. इनामदार यांना आरोपी करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने सहकार आयुक्तांना पत्रव्यवहार पुर्ण करून त्याची प्रक्रिया पुर्ण केली आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १६४ कलमाप्रमाणे जबाब नोंदवण्याचे काम सुरु असून १२ आठवड्यांच्या आत या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करणार असल्याचे सांगितले..

    केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयानंतर इनामदार यांनी मनी लॉंडरिंगद्वारे बॅंकेत गैरव्यवहार केल्याची तक्रार तहेरिक-ए-अवामी महाजचे सदस्य आसिफ खान यांनी केली होती. तसेच बॅंकेचे संचालक एस. एम. इक्बाल यांनीही बॅंकेच्या गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावरून सीबीआयने 2018 मध्ये संपुर्ण राज्यात बॅंकेच्या शाखांवर छापेमारी करत कागदपत्रे ताब्यात घेतली होती. त्यामध्ये पुण्याच्या मुख्य शाखेसह बारामती आणि लोणावळ्याच्याही शाखांचा समावेश होता. तसेच सहकार आयुक्तांनी पी. ए. इनामदार यांना आरोपी करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती मुस्लिम को-ऑप. बॅंकेचे संचालक एस. एम. इक्बाल यांनी दिली.



    यासंदर्भात पी ए इनामदार म्हणाले, नोटबंदी काळात दाखल झालेल्या गुन्ह्यात मी आरोपी नाही. सध्या दि मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. एम एस इकबाल सध्या बँकेवर संचालक आहेत. त्यांना पुन्हा निवडून यायचे असल्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या ते पेरत आहेत.

    सीबीआयने आम्हाला याबाबत अधिकृत कोणती माहिती कळवली नाही किंवा आमच्याशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे याबाबत मी सध्या तरी काहीही बोलू शकत नाही. मात्र हा सर्व विषय राजकीय झाला आहे. यामागे राजकारण आहे. सीबीआयकडून अथवा न्यायालयाकडून याबाबत विचारणा झाल्यास त्याला आम्ही योग्य ते उत्तर देऊ. या आरोपांमध्ये तथ्य नाही. हा सर्व खोडसाळपणा चा प्रकार आहे.

    Will file a chargesheet against Inamdar; CBI information in court

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस