विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : देशपातळीवर झालेल्या समझोत्यामुळे कोल्हापूर मधील विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. अमल महाडिक यांनी माघार घेतली आणि कोल्हापूरमध्ये कॉंग्रेसची सत्ता राहिली. तर हा समझोता पुढील काळात टिकून राहणार का? यावर मात्र राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
Will ‘compromise’ in Mahadik-Patil group appear again in upcoming elections?
लोकसभा, विधानसभा, विधानपरिषदे सोबतच महापालिका, जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघटना या सर्व निवडणुकीच्या निमित्ताने अनेकवेळा महाडिक आणि सतेज पाटील या दोन गटांमध्ये वेळोवेळी संघर्ष उफाळून आलेला पाहिला आहे. हा संघर्ष अतिशय हिंसेच्या मार्गावर देखील गेलेला होता. त्यामुळे नुकत्याच झालेला हा समझोत्यामुळे कोल्हापूरमध्ये आश्चर्य आणि आनंद देखील व्यक्त केला जात आहे.
अमल महाडिक यांनी घेतली माघार! कोल्हापूरात सतेज पाटील बिनविरोध निवडून आले
आता जिल्हा बँकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. तसेच राजाराम कारखान्याच्या निवडणुकादेखील येणार आहेत. आणि त्यानंतर बाजार समितीच्या निवडणुका ही येणार आहेत. त्यामुळे विधान परिषदेमध्ये राज्यपातळीवर सुरू झालेला समझोता एक्स्प्रेसचा हा ज्यांना पुन्हा फडकणार का अशी चर्चा सध्या रंगलेली आहे.
Will ‘compromise’ in Mahadik-Patil group appear again in upcoming elections?
महत्त्वाच्या बातम्या
- आळंदीकडे जाणाऱ्या दिंडीला वाहनाची धडक; दोन वारकऱ्यांचा मृत्यू, ३० जखमी रुग्णालायात दाखल
- छत्तीसगड : सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी चकमक, एका कुख्यात नक्षलवादी कमांडरला केले ठार
- ARJUN KHOTKAR : जालना येथील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची ईडीकडून तब्बल १२ तास चौकशी; रात्री २ पर्यंत ED पथक जालन्यात
- RED ALERT : दक्षिण भारतात Red Alert ; सलग 26 दिवस पावसाचा कहर ; केरळसाठी विशेष पूर सूचना