विशेष प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाच्या गेल्या अधिवेशनात भाजपने विशेषतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तुफान राजकीय बॉलिंग करून महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारमधील मंत्री शिवसेनेचे संजय राठोड आणि राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विकेट काढल्या. (सचिन वाझे, परमवीर सिंग यांचे झेल गेले.) will ajit pawar and anil parab resign from thackeray cabinet in maharashtra assembly mansoon session?
ते अधिवेशन १० दिवसांचे होते. १० ही दिवस देवेंद्र फडणवीस फुल्ल फॉर्ममध्ये होते. ते इतके की बॉल माझा, बॅट माझी, पिच माझे, ग्राउंड माझे आणि प्रेक्षकही माझे. अशी अवस्था होती. फक्त राजकीय विकेटी पडल्या ठाकरे – पवार सरकारमधील दोन मंत्र्यांच्या अशी अवस्था होती.
विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या आगामी अधिवेशनात देखील काय घडू शकते, याची झलक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून दाखविली आहे. राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे मातोश्रीचे निकटवर्ती मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशीची मागणी चंद्रकांतदादांनी करून त्या पत्रात भरपूर आरोपांचा काळा चिठ्ठा जोडला आहे.
या पत्राची दखल अमित शहा कशी घेतात?? केव्हा घेतात? कशा प्रकारे घेतात?? यावर बऱ्याच गोष्टी अवलबूंन आहेत. अमित शहा हे अजितदादा आणि अनिल परबांची चौकशी लावण्यासाठी अधिवेशनाच्या सुरूवातीचा मुहूर्त धरतात की दोन दिवसांच्या मधला मुहूर्त धरतात?? या वर या दोन्ही मंत्र्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. त्याच बरोबर मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याभोवती देखील चौकशी आणि तपासाचा घेराबंदी लावण्यात येते का हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे.
will ajit pawar and anil parab resign from thackeray cabinet in maharashtra assembly mansoon session?
महत्त्वाच्या बातम्या
- विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक; आमदार थोपटे, पटेलांचे नाव आघाडीवर
- दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना न्यूमोनियाची लागण, हिंदुजा रुग्णालयात दाखल
- कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसाठी मिळणार भरपाई, सुप्रीम कोर्टाचे NDMAला रक्कम ठरवण्याचे निर्देश
- सावधान : कोरोनाची लस घेण्यापूर्वी पेन किलर वापरू नका, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
- Covid Vaccine : भारत बायोटेकला मोठा झटका, ब्राझीलने सस्पेंड केली कोव्हॅक्सिनची डील