विशेष प्रतिनिधी
पुणे: कौटुंबिक न्यायालयात एक दाम्पत्य घटस्फोटासाठी आले होते. यावेळी पत्नीने घटस्फोटास नकार दिल्याने पतीने पत्नीला तोंडावर मारल्यामुळे तिचा दात पडला. शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत सदर गृहस्थाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Wife’s tooth decayed in family court by husband
या गृहस्थाचे नाव सचिन विकास पवार आहे. (वय ३४). रा.लोहगाव रोड. २७ नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात दुसऱ्या मजल्यावर असलेल्या समुपदेशन केंद्राच्या बाहेर सदर घटना घडली. सदर गृहस्थाची पत्नी सोलापूर येथे राहते. तिने याबाबत फिर्याद दिली आहे. हे दोघे पती-पत्नी असून दोघेही विभक्त राहत आहेत.
घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर समुपदेशनासाठी दोघे कौटुंबिक न्यायालयात आले होते. यावेळी पतीने पत्नीला घटस्फोट देण्याविषयी सांगितले पण पत्नीने नकार दिला. याचा राग येऊन आरोपीने फिर्यादीच्या तोंडावर जोरात ठोसा मारला आणि फिर्यादीचा एक दात पडला. पत्नीचा खालचा अर्धा दात पाडून जखमी केल्याचा गुन्हा पतीवर दाखल झाला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक माने पुढील तपास करीत आहेत.
Wife’s tooth decayed in family court by husband
महत्त्वाच्या बातम्या
- रामजन्मभूमी खटल्याचा निकाल धर्माच्या नव्हे तर कायदे आणि संविधानाच्या आधारावर, रंजन गोगोई यांनी केले स्पष्ट
- जमीनीवरील राजकारणी, वेदना सहन करत महिला खासदार सायकलवर जाऊन प्रसुतीसाठी झाल्या दाखल
- नव्या वर्षात १२ सुट्या वाया! शनिवार-रविवारी आल्याने होणार कर्मचाऱ्यांचे नुकसान
- सायरस पूनावाला सोडून जगातील सगळ्या धनाड्यांना ओमिक्रॉन कोरोना व्हायरस झटका, अब्जावधी रुपयांचे नुकसान