• Download App
    ब्लॅक पबचा मालक संदीप सांगळेचे नाव एफआयआर मधून का वगळले??, खासदार मेधा कुलकर्णींची पोलीस आयुक्तांना विचारणा|Why was Black Pub owner Sandeep Sangle's name omitted from the FIR??, MP Medha Kulkarni asked the Police Commissioner

    ब्लॅक पबचा मालक संदीप सांगळेचे नाव एफआयआर मधून का वगळले??, खासदार मेधा कुलकर्णींची पोलीस आयुक्तांना विचारणा

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : कल्याणी नगर मधल्या हिट अँड रन केस मध्ये पण बड्या बापाच्या बेट्याने दोन इंजिनियर्सचे बळी घेतले. वेदांत अग्रवाल याने पब मध्ये दारू पार्टी करून पोर्शे कार एक तरुण आणि एक तरुणी अशा दोन इंजिनियर्सला उडविले. वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असल्याचे कारण दाखवून सुरुवातीला त्याला जामीन मंजूर केला.Why was Black Pub owner Sandeep Sangle’s name omitted from the FIR??, MP Medha Kulkarni asked the Police Commissioner

    पण नंतर या प्रकरणात प्रचंड राजकीय गदारोळ झाल्यानंतर पोलिसांनी ही केस फिरवली. वेदांत अग्रवालचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल यांच्यासह कोझी पबचा मालक नमन प्रल्हाद भुतडा आणि ब्लॅक पबचा मालक संदीप रमेश सांगळे या दोघांना अटक केली. त्यांना पोलीस कोठडी ठेवले. परंतु, एफआयआर मधून ब्लॅक पबचा मालक संदीप रमेश सांगळे यांचे नाव वगळले गेल्याची बातमी समोर आली.



    संदीप प्रमेश सांगळे त्याचे नाव का एफआयआर मधून वगवळले??, अशी विचारणा राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन केली. यासंदर्भात त्यांनी एक निवेदन पोलीस आयुक्त यांना दिले. पुण्यात अनेक ठिकाणी रहिवासी भागांमध्ये रूफ टॉप बार, पब आणि रेस्टॉरंट बेकायदा सुरू आहेत. तिथले रहिवासी या सगळ्याला वैतागले आहेत पोलिसांनी तातडीने या पब, बार आणि रेस्टॉरंट वर त्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार मेघा कुलकर्णी यांनी केली.

    राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोझी बार आणि ब्लॅक पबवर मोठी कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोझी बार आणि ब्लॅक पब सील केले. पुण्यात एकूण 32 पब बार आणि रेस्टॉरंट यांच्यावर कारवाई झाली काही पबवर बुलडोझर चालवले गेले. पण या कारवाई विरोधात पुण्यातल्या काही पब बारचालकांनी आंदोलन केले.

    कोझी बार आणि ब्लॅक पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज मोठी कारवाई करत ते सील केले. या बारमधील दारू विक्री बंद करण्यात आली आहे. ‘याठिकाणी कुठल्याच दारुशी संबंधित व्यवहार त्यांना करता येणार नाही. पुढील आदेश येईलपर्यंत हे व्यवहार बंद राहतील, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कोझी बार आणि ब्लॅक पबच्या मालक आणि व्यवस्थापकाला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांना 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

    कोझी बारचे मालक नमन प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन अशोक काटकर, ब्लॅक पबचे मालक संदीप रमेश सांगळे असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये मद्य पुरविल्याप्रकरणी दोन्ही बार मालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विद्या विभुते आणि योगेश कदम यांनी केली होती. आरोपींच्या वतीने ऍड. एस. के. जैन यांनी बाजू मांडली.

    Why was Black Pub owner Sandeep Sangle’s name omitted from the FIR??, MP Medha Kulkarni asked the Police Commissioner

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!