प्रतिनिधी
मुंबई : संजय राऊत यांच्या घरावर रविवारी सकाळी ईडीने छापे घातले. ईडीच्या कारवाईवर राज्यातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास आता सुरूवात झालेली आहे. जर पत्राचाळ प्रकरणात त्यांनी काही चुकीचे केले नसेल तर घाबरण्याचे कारण नाही. पण बाळासाहेब ठाकरेंची शपथ न घेता त्यांनी शरद पवारांची शपथ घ्यायला हवी होती, असा टोला रामदास कदमांनी राऊतांना लगावला आहे. Why swear by Balasaheb Thackerayswear by Sharad Pawar Ramdas Kadam Tola to Sanjay Raut
स्वार्थ साधला, आमदारांना वाऱ्यावर सोडले
महाविकास आघाडी सरकारचा उदय होण्यास राऊत सर्वाधिक जबाबदार आहेत त्यांना राष्ट्रवादी विशेषत: शरद पवार यांच्यासोबत युती करण्यात जास्त रुची होती. मी त्याला कायम विरोध केला. शिवसेनेची भाजप सोबत युती व्हावी अशी माझी भूमिका होती, असे रामदास कदमांनी सांगितले. संजय राऊत यांनी फक्त स्वार्थ साधला. आमदारांना वाऱ्यावर सोडले उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा फायदा घेत महाविकास आघाडीची जुळवाजुळव केली होती, अशी खोचक टीका रामदास कदमांनी राऊतांवर केली आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा सर्वात कमी निधी हा सेनेच्या आमदारांना दिला होता. सर्वाधिक निधी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या आमदारांना आणि शिवसेनेच्या आमदारांना फक्त १७ % निधी हा कोणता न्याय?, जर शिवसेनेबद्दल एवढे प्रेम होते तर आमदारांवर अन्याय होताना त्यांनी आपली रोखठोक भूमिका का मांडली नाही?, असा सवाल रामदास कदमांनी संजय राऊतांना केला आहे.
Why swear by Balasaheb Thackerayswear by Sharad Pawar Ramdas Kadam Tola to Sanjay Raut