• Download App
    देश सोडून पळून गेलेल्या परमबीर यांच्या आरोपांवर केंद्रीय एजन्सीने विश्वास का ठेवावा ? - जयंत पाटीलWhy should the central agency believe the allegations of Parambir who fled the country? - Jayant Patil

    देश सोडून पळून गेलेल्या परमबीर यांच्या आरोपांवर केंद्रीय एजन्सीने विश्वास का ठेवावा ? – जयंत पाटील

    ‘छगन भुजबळ साहेबांना तुरुंगात डांबण्याचं काम भाजप सरकारनं केलं. परंतु कोर्टानं त्यांना निर्दोष मुक्त केलं. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे भाजपची यंत्रणा लागली आहे.Why should the central agency believe the allegations of Parambir who fled the country? – Jayant Patil


    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : अनिल देशमुखांवर आरोप करणारे परमबीर सिंह देश सोडून पळून गेले आहेत. त्यांच्या आरोपांवर ईडी व इतर यंत्रणांनी का विश्वास ठेवावा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे .



    राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा नाशिकमध्ये दाखल झाली आहे. तिथं कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. ‘छगन भुजबळ साहेबांना तुरुंगात डांबण्याचं काम भाजप सरकारनं केलं. परंतु कोर्टानं त्यांना निर्दोष मुक्त केलं. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे भाजपची यंत्रणा लागली आहे.

    लोकांची दिशाभूल करून सरकारला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. सरकार चांगलं काम करत असताना नाहक त्रास दिला जात आहे हे लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे,’ असंही जयंत पाटील म्हणाले.

    Why should the central agency believe the allegations of Parambir who fled the country? – Jayant Patil

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation Sindoor impact : भारत इथून पुढे दहशतवादाला act of war समजूनच ठोकणार, म्हणजे नेमके काय करणार??

    Fatah-2′ missile : चीनने पाकिस्तानला दिलेले ‘फतह-२’ क्षेपणास्त्र भारताने पाडले

    Indian Army : भारतीय लष्कराने जारी केला एक व्हिडिओ अन् पाकिस्तानच्या खोटेपणचा बुरखा फाटला