• Download App
    किरीट सोमय्या यांची स्टंटबाजी कशासाठी..? त्यांना अधिकार कोणी दिला..? कार्यकर्त्याना संयम बाळगण्याचे हसन मुश्रीफ यांचे आवाहन|Why Kirit Somaiya's stunt ..? Who gave them the right ..? Hassan Mushrif calls on activists to exercise restraint

    किरीट सोमय्या यांची स्टंटबाजी कशासाठी..? त्यांना अधिकार कोणी दिला..? कार्यकर्त्याना संयम बाळगण्याचे हसन मुश्रीफ यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी खोटे आरोप केले आहेत. आता त्यांची कारखान्यावर जाण्याची स्टंटबाजी कशासाठी..? त्यांना हा अधिकार कोणी दिला असा सवाल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा. माझी प्रकृती उत्तम आहे व काळजीचे काहीही कारण नाही, असे आवाहनही त्यांनी केले आहे.Why Kirit Somaiya’s stunt ..? Who gave them the right ..? Hassan Mushrif calls on activists to exercise restraint

    मुश्रीफ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की सोमय्या यांनी माझ्यावर व माझ्या कुटुंबियांवर खोटी तक्रार करून आरोप केलेले आहेत. त्यांनी काही कागदपत्रे केंद्रीय तपास यंत्रणांकडे दिलेली आहेत. यापूर्वीही केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापा, चौकशी झाली आहे. तपास यंत्रणा ज्यावेळेस चौकशी करतील त्याचे योग्य उत्तर आम्ही देऊन त्यांना सहकार्य करूच.



    परंतु; किरीट सोमय्या यांची ही स्टंटबाजी कशासाठी..? त्यांना हा अधिकार कोणी दिला..? कारण त्याना एक सवय लागली आहे की तक्रार करायची व तिथे जाऊन पर्यटन करून प्रसिद्धी मिळवायची. त्यातूनच विनाकारण बदनामी करण्याचा प्रकार करायचा.

    माझ्यावर प्रेम करणारे, माझी ३० -३५ वर्षाची सामाजिक व राजकीय कारकीर्द माहित आहेत, ते स्वस्थ बसणार नाहीत याची मला खात्री आहे. परंतु; भाजपच्या अशा कटकारस्थानाना बळी पडू नका. संयम ठेवा, त्यांना अडवू नका. त्यांना माझा सल्ला आहे, मराठ्यांचा शूरवीर व बाणेदार सरसेनापती संताजी घोरपडे यांचे जिवंत स्मारक असलेला सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना त्यांनी बाहेरून नव्हे आत जाऊन पाहावा. आमचे मोजकेच लोक स्वागत करतील.

    माझा पक्ष, माझा नेता शरद पवार व केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर, परमवीरसिंग यांचेकडून भाजपने केलेली पक्षाची बदनामी याबद्दल मी सातत्याने भाजप पक्षावर आवाज उठवत आहे. त्यामुळे माझा आवाज दाबण्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा प्रयत्न आहे, असा आरोपही मुश्रीफ यांनी केला आहे.

    Why Kirit Somaiya’s stunt ..? Who gave them the right ..? Hassan Mushrif calls on activists to exercise restraint

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस