विशेष प्रतिनिधी
मुंबई : अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी मला जे मुद्दे मांडायचे होते, ते मुद्दे रोहित पवारांनी ऑलरेडी मांडलेत, अशी भावना दिवंगत अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. एखादी इमारत पडली तर त्या इमारतीच्या मालकाला अटक करतात, त्या इमारतीच्या इंजिनिअर्सना नाही. रेस्टॉरंटला आग लागली, तर रेस्टॉरंटच्या मालकाला अटक करतात. मग एवढा मोठा अपघात झाला असताना रोहित सिंगला (विमान कंपनीचे मालक) अजून का अटक झाली नाही? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. Jai Pawar
जय पवार यांनी शनिवारी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारला झाल्या नुकसानीचा तत्काळ पंचनामे करण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना त्यांनी बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा आग्रह धरला. ते म्हणाले, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. शरद पवारांनीही आजच अशी भूमिका व्यक्त केली आहे. अजितदादांचे काम व प्रेम सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे बारामतीकरांचीही तीच इच्छा आहे. काँग्रेसने ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांनी अजून आपला उमेदवार दिला नाही.
विरोधकांना बारामती लढवायची असेल तर लढवावी
या प्रकरणी खूप घडामोडी घडत आहेत. या प्रकरणी आमचे ज्येष्ठ नेते त्यांच्याशी बोलतील. गरज पडली तर आम्हीही त्यांच्याशी संवाद साधू. पण बारामतीकरांचे पवार कुटुंबीयांवर खूप प्रेम आहे. जनता अजूनही खूप भावनिक आहे. त्यामुळे विरोधकांना लढायचे असेल तर लढावे, पण बारामतीकर या निवडणुकीत काय करणार आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आम्ही अजित पवारांशिवाय निवडणूक लढवण्याची कल्पनाही केली नव्हती. मी यावर फार बोलणार नाही. मी फार भावनिक आहे. मी सर्वांपुढे याविषयी बोलणार नाही, असे ते म्हणाले.
माझे मुद्दे रोहितदादांनी ऑलरेडी मांडलेत
पत्रकारांनी यावेळी जय पवार यांना विमान अपघातावर तुम्ही एक पत्रकार परिषद घेणार होता, ती अजून का घेतली नाही, असा प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, ही पत्रकार परिषद न घेण्याचे काहीही कारण नाही. जे मुद्दे मला बोलायचे होते, त्या मुद्यातील काही मुद्दे ऑलरेडी रोहित पवारांनी सांगितले आहेत. मला जे मुद्दे बोलायचे होते ते मुद्दे रोहितदादांच्या पत्रकार परिषदेत कव्हरअप झाले. त्यामुळे या प्रकरणी जोपर्यंत फायनल अहवाल येत नाही, तोपर्यंत मी त्यावर बोलून उगीचच संभ्रम पसरवू नये. आम्हाला वैयक्तिक पातळीवर जे वाटते ते वाटते, पण जेव्हा अंतिम अहवाल येईल तेव्हा तुमच्यापुढे येऊन सर्वकाही स्पष्ट करेन.
रोहित पवारांच्या भूमिकेला पाठिंबा आहे का?
पत्रकारांनी यावेळी जय पवार यांना तुमचा रोहित पवारांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा आहे का? असा प्रश्न केला असता ते म्हणाले, मी तसे नाही बोललो. तुम्ही माझ्या मुद्द्यांचा चुकीचा उल्लेख करू नका. मी बोललो, माझे जे मुद्दे होते ते त्यांनी कव्हरअप केलेत. यापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता. त्यात रोहित सिंग व्हिडिओत झोपलेले होते. तेव्हा मी आग्रह धरला की, जर असा अपघात झाला तर काय? एखादी इमारत पडली तर त्या इमारतीच्या मालकाला अटक करतात, त्यांच्या इंजिनिअर्सना करत नाहीत. रेस्टॉरंटला आग लागली तर रेस्टॉरंटच्या मालकाला अटक करतात. मग जेव्हा असा मोठा अपघात होतो तेव्हा त्यांनाही अटक झाली पाहिजे ही माझी मागणी आहे.
पवार कुटुंब एकत्र राहावे असे वाटते
जय पवार यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या मुद्यावरही भाष्य केले. या प्रकरणी माझे वैयक्तिक काहीही नाही. मी खूप छोटा आहे. या प्रकरणी वहिनी असतील, पार्थ दादा असेल, बाकीचे ज्येष्ठ नेते असतील ते ठरवतील. मला वाटते की, आम्ही कुटुंब म्हणून सर्वजण एकत्र राहावे. कारण, तुम्हाला माहिती आहे की, जेव्हा दादा आपल्याला सोडून गेले तेव्हा सर्व पवार कुटुंब एकत्रित होते. आजही आम्ही एकत्र आहोत. आजही आम्ही एकमेकांशी बोलतो. राजकारणाच्या भागावर जास्त संभाषण करणे मला योग्य वाटत नाही. ते आपल्या पक्षातील वरिष्ठ नेते बोलतील, असे जय पवार म्हणाले.
“Why is Rohit Singh Not Arrested?”: Jai Pawar Questions Father’s Plane Crash Probe
महत्वाच्या बातम्या
- शिवछत्रपतींनी उभारलेले किल्ले संस्कृतीचे चैतन्यमय तीर्थाटन; खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदींचे प्रतिपादन
- Raghav Chadha : आप ने राघव-चड्ढा यांना राज्यसभेतून उपनेता पदावरून हटवले; चार वर्षांपासून खासदार
- Amit Shah : शहा म्हणाले- 15 दिवस बंगालमध्ये राहणार; ममतांना त्यांच्याच घरात हरवायचे आहे, TMCला खाडीत फेका
- विधानसभेच्या पोटनिवडणुकीत बारामती मध्ये काँग्रेसला राजकीय पुनरुज्जीवनाची संधी!!