प्रतिनिधी
सोलापूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धोरणामुळे साखरेचे उत्पादन 22 % टक्के कमी होऊन इथेनॉलचे उत्पादन वाढले. पण हेच धोरण शरद पवारांना 10 वर्षे केंद्रात कृषिमंत्री असताना का राबवता आले नाही?, असा परखड सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. पण नंतर त्यांनी स्वतःच त्याचे उत्तरही दिले आहे. कारण शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते नव्हेत, तर साखर कारखानदारांचे नेते आहेत, असे शरसंधान राजू शेट्टींनी साधले.Why didn’t Pawar get what Gadkari did at the Center ??; Answer after Raju Shetty’s tough question
महाविकास आघाडीवर नाराज होऊन आघाडीमधून बाहेर पडलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शरद पवार हे केंद्रीय कृषीमंत्री असतानाच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नितीन गडकरी यांना केंद्र सरकारमध्ये राहून जे साध्य झाले, ती गोष्ट शरद पवार यांना का नाही जमली?, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला. नितीन गडकरी यांच्या धोरणामुळे साखरेचे उत्पादन २२ % कमी होऊन इथेनॉलचे उत्पादन वाढले.
मात्र, हेच धोरण शरद पवारांना 10 वर्षे केंद्रात कृषिमंत्री असताना का राबवता आले नाही? गडकरी हे कौतुकास पात्र आहेतच. मात्र, शरद पवार हे कृषीमंत्री होते. साखर कारखानदारांचे मंत्री होते. त्यांना ही गोष्ट का जमली नाही?, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला.
यावेळी राजू शेट्टींनी त्यांनी शरद पवार यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली. शरद पवार हे साळसूदपणे शेतकऱ्यांना सांगतात की, साखर कारखान्यामध्ये साखर शिल्लक राहिल्यामुळे त्यांच्यावर जे कर्ज काढले जाते. त्याच्या व्याजाचा बोजा हा कारखान्यावर पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुकड्यातुकड्याने पैसे घ्यावेत. 18 – 20 महिने शेतकऱ्यांचा ऊस शेतात उभा असतो एवढे महिने शेतकऱ्यांचे पैसे त्यात गुंतलेले असतात. त्याचे व्याज त्यावर चालू असते. याचा विचार शरद पवार करीत नाहीत, असे शरसंधान राजू शेट्टी यांनी साधले.
गडकरींची पर्यायी इंधनाची योजना
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्सिट्यूटमध्ये शनिवारी साखर परिषदेत गडकरी यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत झाली. भविष्यात ऊसापासून तयार होणारे इथेनॉल हे इंधनाला कशाप्रकारे पर्याय ठरू शकते, याबाबत सविस्तर विवेचन केले होते. आगामी काळात फ्लेक्स फ्युएल इंजिनांमुळे पेट्रोल – डिझेलऐवजी 100 % इथेनॉल वापरुन वाहने चालवणे शक्य होईल.
देशात सध्या पेट्रोल-डिझेलमध्ये 20 % इथेनॉल ब्लेंडिगचे धोरण आहे. हे प्रमाण आगामी काळात वाढल्यास इथेनॉल निर्मितीमधून साखर कारखानदारांना चांगले उत्पन्न मिळू शकेल. यामुळे कारखान्यात आलेल्या सर्वच ऊस साखरनिर्मितीसाठी वापरला जाणार नाही. त्यामुळे साखरेचे उत्पादनही आटोक्यात राहील आणि साखरेचे भाव हे स्थिर राहतील, असे गडकरी यांनी म्हटले होते.
तर केंद्रातून महाराष्ट्राला मदत करणारा एकमेव मंत्री अशा शब्दांत शरद पवार यांनी गडकरींची स्तुती देखील केली होती. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी पवारांचे 10 वर्षांचे कृषिमंत्री पद या विषयावर नेमकेपणाने शरसंधान साधले आहे. गडकरींच्या धोरणामुळे जमले ते धोरण पवारांना राबविता आले नाही. कारण ते साखर कारखानदारांचे नेते ठरले, असे टीकास्त्र राजू शेट्टी यांनी सोडले.
Why didn’t Pawar get what Gadkari did at the Center ??; Answer after Raju Shetty’s tough question
महत्वाच्या बातम्या
- MPSC नोकरीची संधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 1085 रिक्त जागांसाठी भरती
- पोस्टात नोकरीची संधी : महाराष्ट्रात 3026 पदांची भरती; आज 5 जून अर्जासाठी शेवटचा दिवस!!
- ही तो श्रींची इच्छा ते बाळासाहेबांची इच्छा!!
- सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांना हवाय राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री; तर सुनील तटकरे म्हणतात देवेंद्र फडणवीस उत्तम!!