अचानक मुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यामुळे कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्वत: येऊन विधानभवनाची पाहणी केली.Why did you ask the staff of Vidhan Sabha to go home at 6 o’clock? Nitesh Rane’s sharp question to the Chief Minister
विशेष प्रतिनिधी
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर बरेच दिवस मुख्यमंत्री विश्रांतीवर होते. दरम्यान शुक्रवारी (१७ डिसेंबर ) रात्री ८ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह अचानक विधान भवनात दाखल झाले.
अचानक मुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यामुळे कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्वत: येऊन विधानभवनाची पाहणी केली.
विधान भवनातील विधानसभा आणि विधान परीषदेच्या दोन्ही सभागृहात जाऊन त्यांनी तिथल्या पूर्व तयारीची पाहणी केल्याची माहिती दिली आहे. यावरून भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मुख्यमंत्री विधान भवनात गेले असतील तर ही खूप आनंदाची बातमी आहे. पण जर मुख्यमंत्री गेले होते तेव्हा तेथील सीसीटीव्ही कॅमेरे का बंद ठेवण्यात आले होते ? असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे.पुढे राणे म्हणले की , विधान सभेतील कर्मचाऱ्यांना ६ वाजता घरी जाण्यास का सांगितले होते.एवढं कसले गुपित आहे? असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.