• Download App
    रावसाहेब दानवे यांची अर्धी कटींग करणाऱ्याला २१ हजाराचे बक्षीस, नाभिक समाजाने का केली ही घोषणा?|Why did the Nabhikr community announce a reward of Rs 21,000 for the one who do half cutting of Raosaheb Danve in half?

    रावसाहेब दानवे यांची अर्धी कटींग करणाऱ्याला २१ हजाराचे बक्षीस, नाभिक समाजाने का केली ही घोषणा?

    विशेष प्रतिनिधी

    जालना : नाभिक समाजाच्या वतीने केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची अर्धी कटींग करणाऱ्याला २१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. तिरुपती येथील नाभिक समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप दानवे यांच्यावर केला आहे.Why did the Nabhikr community announce a reward of Rs 21,000 for the one who do half cutting of Raosaheb Danve in half?

    महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असताना रावसाहेब दानवे यांनी या सरकारची अवस्था तिरुपती येथील न्हाव्यांसारखी झाली असल्याचं म्हटले होते. ते म्हणाले, तिरुपतीमधील न्हावी डोक्यावर दोन – दोन वस्तारे मारून ग्राहकांना बसवून ठेवतात, तसे आघाडी सरकार करतेय.



    यावरून न्हावी समाज आक्रमक झाला आहे. दानवे यांची अर्धी कटींग करणाºयाला २१ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.दानवे म्हणाले होते की, तीन वर्षांत महाविकास आघाडी सरकारने काहीच कामं केली नसून फक्त काही लाखांच्या निधीवरच रस्त्यांची बोळवण सुरु आहे.

    त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांची तुलना तिरुपती बालाजी येथील न्हाव्यांशी केली होती. ते म्हणाले होते, तिरुपतीमधील न्हावी डोक्यावर दोन-दोन वस्तारे हाणून ग्राहकांना बसवून ठेवतात, तसं आघाडी सरकारचं सुरु आहे.

    Why did the Nabhikr community announce a reward of Rs 21,000 for the one who do half cutting of Raosaheb Danve in half?

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस