प्रतिनिधी
मुंबई : खरी शिवसेना कोणाची याचा फैसला सुप्रीम कोर्टात होत असताना संजय राऊत यांनी नशिबावर हवाला ठेवत वेळ बदलत असल्याचा निर्वाळाही दिला आहे. Whose real Shiv Sena?; Sanjay Raut’s Havala on fate, Nirvala of changing times
मागच्या सहा महिन्यांपासून सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेल्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची मंगळवारी सुनावणी होत आहे. या सुनावणीपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले आहे. राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मन मे हमेशा जीत की आस होनी चाहिए, नसीब बदले या ना बदले, वक्त जरुर बदलता है’, अशा आशयाचा हा शेर आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्वी संजय राऊत यांनी नशिबावर हवाला ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात महाविकास आघाडीची स्थापना करण्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या काळातही संजय राऊत सोशल मीडियावरुन दररोज सूचक संदेश देत होते. आज सुप्रीम कोर्टातील सुनावणीपूर्वी संजय राऊत यांनी ट्विटवर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
Whose real Shiv Sena?; Sanjay Raut’s Havala on fate, Nirvala of changing times
महत्वाच्या बातम्या
- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा परिणामकारक मुकाबला; गावकऱ्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण
- जगातील सर्वात मोठी रिव्हर क्रूझ गंगेवर चालणार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन
- खरी शिवसेना कोणाची?; संजय राऊतांचा नशिबावर हवाला, वेळ बदलल्याचा निर्वाळा
- CET परीक्षांच्या तारखा जाहीर; मार्च ते मे 2023 पाहा वेळापत्रक