परिवहण मंत्री अनिल परब यांनी काल एसटी कर्मचाऱ्यांच्या समन्वयकांसोबत बैठक घेतली तरीही हा प्रश्न सुटला नाही.Who says don’t give, don’t live without taking! May the victory of workers’ unity be “- Chitra Wagh
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मागील आठ दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हे कर्मचारी आंदोलन करत आहेत. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेले असताना दुसरीकडे महामंडळ कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. परिवहण मंत्री अनिल परब यांनी काल एसटी कर्मचाऱ्यांच्या समन्वयकांसोबत बैठक घेतली तरीही हा प्रश्न सुटला नाही.
दरम्यान भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी चित्रा वाघ कर्मचाऱ्यांना म्हणाल्या की , राज्य सरकार तुमच्यावर वेगवेगळा दबाव निर्माण करत आहे. आजीबात घाबरू नका बंधू आणि भगिणींनो, हे कसे काय करतात आपण बघू. कोण म्हणतं देत नाय, आन आपण घेतल्याशिवाय राहत नाय! कामगार एकजुटीचा विजय असो, अशा घोषणाही चित्रा वाघ यांनी दिल्या.
चित्रा वाघ यांनी ट्विट करत आघाडी सरकारवर टीका केली आहे. चित्रा वाघ म्हणल्या, तीन भिन्न विचारी पक्षांच्या विलीनीकरणातून महाविकास आघाडी सरकार सरकार स्थापन होऊ शकते. तर एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण का होऊ शकत नाही? सत्तेचा ‘मलिदा’ओरबाडून खाणारं तिघाडी सरकार. कर्मचाऱ्यांचे प्रश्न कधी सोडविणार? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
तसेच या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपच्या बऱ्याच नेत्यांनी जाहीर पाठिंबा दर्शिवला आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही आंदोलनात सहभाग नोंदविला आहे.परंतु या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर होत चालला आहे.
Who says don’t give, don’t live without taking! May the victory of workers’ unity be “- Chitra Wagh
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान, पण मुख्यमंत्री – पवारांकडून अद्याप दखल नाही!!… का??
- कर्जत शहराच्या वैभवात भर पडणार ; राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार – अजित पवार
- गडचिरोली एन्काऊंटरमध्ये कुप्रसिद्ध नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे ठार; दिलीप वळसे-पाटलांनी आज कन्फर्म केली बातमी
- मेंदूचा शोध व बोध : आपला मेंदू असतो सतत आव्हानांच्या शोधात