दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटनंतर आता महेश मांजरेकर नेमकी काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागंल आहे .Who is Mahesh Manjrekar? Strong criticism of Jitendra Awhad
विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर आगामी ‘गोडसे’ सिनेमाची घोषणा केली. यासोबतच महेश मांजरेकर यांनी इन्स्टाग्रामवरुन गोडसे सिनेमाचा पोस्टर शेअर केला आहे. मात्र हा पोस्टर शेअर होताच नवा वाद उभा राहिला आहे.
दरम्यान यावरुन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर निशाणा साधत सडकून टीका केली आहे.जितेंद्र आव्हाड यांनी महेश मांजरेकर आहे तरी कोण? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं काय योगदान आहे? केवळ लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी महेश मांजरेकर ही नाटकं करत आहेत, अशी टीका केली.
दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटनंतर आता महेश मांजरेकर नेमकी काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागंल आहे .मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्विटनंतर आता गोडसे चित्रपटावरुन नवा वाद निर्माण झाला आहे हे तर नक्कीच.
महेश मांजरेकर नक्की काय म्हणाले?
महेश मांजरेकरांनी सिनेमाचा टीझर शेअर करताना म्हटलं आहे आहे की, वाढदिवसाच्या सर्वात घातक शुभेच्छा! यापूर्वी कोणीही सांगण्याचे धाडस केले नाही अशा कथेच्या साक्षीसाठी सज्ज व्हा! संदीप सिंग, राज शांडिल्य आणि महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींच्या १५२ व्या जयंतीनिमित्त “गोडसे” सिनेमाची घोषणा केली आहे”.
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “नथुराम गोडसेची गोष्ट नेहमीच माझ्या ह्रदयाच्या जवळ राहिली आहे. अशा पद्धतीच्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी खूप धाडस लागतं. मी नेहमीच कठीण विषय आणि गोष्ट सांगताना कोणतीही तडजोड करु नये यावर विश्वास ठेवला आहे.
मांजरेकर म्हणाले की , ” महात्मा गांधींचा मारेकरी याव्यतिरिक्त लोकांना गोडसेबद्दल जास्त माहिती नाही. ही गोष्ट सांगताना आम्हाला कोणाचीही बाजू मांडायची नाहीये किंवा विरोधात बोलायचं नाहीये. कोण चूक कोण बरोबर हा निर्णय आम्ही प्रेक्षकांवर सोडणार आहोत”.
Who is Mahesh Manjrekar? Strong criticism of Jitendra Awhad
महत्त्वाच्या बातम्या
- सुनील शेट्टी आर्यन खानच्या समर्थनात बाहेर; नेटिझन्स म्हणाले, “उडत्या पंजाब”वर बोललात, “उडत्या बॉलिवूड” वर गप्प का?”
- बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक सुभाष साबणे देगलूरमधून काँग्रेस विरोधात भाजपचे उमेदवार
- Epidemic Act Violation cases : कोरोना कायद्याअंतर्गत दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगींचे आदेश
- हे बॉलीवूड सेलिब्रिटी एका इंस्टाग्राम पोस्टसाठी घेतात इतके मानधन