विशेष प्रतिनिधी
पुणे – निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्ती दर्शन घोडावत यांनी भेटून आपल्याला म्हणजे सचिन वाझे यांना गुटखा उत्पादक, वितरक आणि विक्रेते यांच्याकडून दरमहा १०० कोटी रूपये वसूल करायला सांगितल्याचे लिहिले आहे… मात्र, हे बेकायदा काम करण्याचे नाकारल्याचेही त्यांनी लिहिले आहे.
पण सचिन वाझेंना भेटलेले हे दर्शन घोडावत कोण… याचा शोध घेतला असता… एका कंपनीचे नाव पुढे आले आले, ते म्हणजे एव्हीए ग्लोबल कंपनी. ग्राहकांना इनोव्हेटिव्ह लॉजिस्टिक्स सोल्यूशन देणारी ही कंपनी आहे. ही कंपनी ग्राहकांना हाय स्टॅंडर्ड कस्टमाइज्ड सोल्यूशन्सही पुरविते.
या कंपनीचे एमडी अर्थात मॅनिजिंग डायरेक्टर आणि सीईओ आहेत, दर्शन घोडावत. कंपनीचे त्यांच्यासह चार संचालक आहेत. आणि त्यापैकी एक संचालक आहेत, पार्थ अजित पवार. कंपनीचे अन्य दोन संचालक आहेत, कौशल विठलानी आणि कॅप्टन अशोक श्रीवास्तव.
पुढील पत्ता कंपनीच्या वेबसाईटवर दिलेला आहे.
405, 4th Floor, Windfall, Sahar Plaza Complex,
J.B Nagar, Andheri – Kurla Road,
Andheri (East), Mumbai – 400059.
परंतु, ज्या दर्शन घोडावत भेटल्याचा उल्लेख सचिन वाझे यांनी पत्रात केला आहे, ते हेच आहेत का… ते नेमके कोण आहेत, याचा खुलासा एनआयए पुढील तपासात करू शकते. दर्शन घोड़ावत हे स्वतःला अजित पवारांचे निकटवर्ती म्हणवून घेऊन सचिन वाझे यांना दोनदा भेटले, असे स्वतः सचिन वाझे यांनीच पत्रात म्हटले आहे. आणि दर्शन घोडावत नामक व्यक्तीच्या कंपनीत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे संचालक आहेत. हा नुसता योगायोग मानायचा का…??
आता कोर्टाच्या आदेशानुसार प्रॉपर प्रोसिजर फॉलो करून सचिन वाझे यांनी एनआयए कडे हे पत्र दिले आहे. ते एनआयए कोर्टात सादर करू शकते. त्यानंतर या एकूण प्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे
who is darshan ghodawat?, parth ajit pawar found to be a director in company of darshan ghodawat, did he met sachin vaze??
इतर बातम्या वाचा…
- ज्याला पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी जंग जंग पछाडलेले आहे असा कोण आहे हा क्रूर नक्षलवादी हिडमा?
- इराणच्या मालवाहू जहाजावर हल्ला, अणुकरार चर्चावर परिणाम शक्य
- मुंबईसह राज्यभरात रेमडेसिव्हिरचा तुटवडा, अनेक ठिकाणी काळाबाजार
- मतांसाठी मुस्लिमांना साकडे घातल्याने निवडणूक आयोगाने बजावली ममता बॅनर्जींना नोटीस; आचारसंहिता भंगाचा ठपका
- अनिल परब हे नार्को टेस्ट, एनआयए, सीबीआय, रॉ चौकशीला सामोरे जाण्यास तयार…; पण त्यांचा मंत्रीपद सोडण्यास नकार