• Download App
    संजय राऊतांच्या अख्ख्या पत्रकार परिषदेत भाजपचे साडेतीन नेते कोण?, हे गुलदस्त्यातच!!Who are the three and a half leaders of BJP in Sanjay Raut's entire press conference

    संजय राऊतांच्या अख्ख्या पत्रकार परिषदेत भाजपचे साडेतीन नेते कोण?, हे गुलदस्त्यातच!!

    प्रतिनिधी

    मुंबई : भाजपचा साडेतीन नेत्यांना तुरुंगात जाण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांचा आजच्या बहुचर्चित महास्फोट पत्रकार परिषदेत बहुतांश वेळ ईडीच्या अधिकाऱ्यांवरच तोफा डागण्यात गेला. भाजपच्या काही नेत्यांची नावे त्यांनी घेतली. किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे विविध आरोप केले. त्यासंबंधीची कागदपत्रे स्वतःकडेच ठेवली आणि पत्रकार परिषदेच्या शेवटी पत्रकारांनी जेव्हा भाजपचे साडेतीन नेते कोण?, असा प्रश्न विचारला तेव्हा भाजपचे साडेतीन नेते अर्धा, पाव, चार आणे असे शब्द असे शब्द वापरत ते तुम्हाला नंतर कळतील असे म्हणून संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सोडली.Who are the three and a half leaders of BJP in Sanjay Raut’s entire press conference

    त्यामुळे ताबडतोब एवढी वातावरण निर्मिती करून घेतलेली पत्रकार परिषद फुसका बार पेक्षाही फुसफुणारी ठरली, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.


    संजय राऊतांची ४ वाजता स्फोटक पत्रकार परिषद, कोणत्या साडेतीन नेत्यांना जेलमध्ये पाठवणार? सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी दिली प्रतिक्रिया



    संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांचीच नावे घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 25 हजारांचा महाआयटी घोटाळा झाला. देवेंद्र फडणवीस यांचा ब्लू आइड बॉय मोहित कंबोजने राकेश वाधवान याच्याकडून 1200 कोटींची जमीन फक्त 100 कोटी रुपयांना खरेदी केली असा आरोप केला. हा मोहित कंबोज देवेंद्र फडणवीस साहेबांना बुडवणार असल्याचेही संजय राऊत म्हणाले.

    परंतु भाजपच्या साडेतीन नेत्यांना तुरुंगात घालणार अशी ची भाषा संजय राऊत यांनी आधी केले होते या भाजपच्या साडेतीन नेत्यांची नावे मात्र त्यांनी नेमकेपणाने घेतलीच नाहीत. त्यामुळे हा फक्त ट्रेलर आहे हळूहळू सिनेमा बाहेर येईल असे सांगून संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सोडली.

    पत्रकार परिषदेतील बहुतांश वेळ संजय राऊत यांनी ईडीच्या अधिकार्‍यांवर तोंडसुख घेण्यात झाल्यावर अधिकारी फूलवाले, टेलर मेहंदीवाले यांच्या कडे जाऊन चौकशी करतात. अलिबाग मधल्या आमच्या 59 गुंठ्यांच्या जमिनीची चौकशी करतात 80 वर्षांच्या म्हातार्‍यांना ईडीच्या कार्यालयात नेऊन बसवतात. त्या सगळ्या ईडीच्या अधिकाऱ्यांकडे आम्ही 2024 नंतर बघून घेऊ. सगळ्यांची नावे टिपून घेण्यात आली आहेत, असा इशारा संजय राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिला. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आणि झारखंड राज्य सरकारे पाडण्यासाठी ईडीचे अधिकारी जंगजंग पछाडत आहेत. परंतु, बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कारातला महाराष्ट्र त्यांना घाबरणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. संपूर्ण पत्रकार परिषदेत साडेतीन भाजपचे साडेतीन नेते कोण याचा मात्र प्रत्यक्षात खुलासा संजय राऊत यांनी केला नाही.

    Who are the three and a half leaders of BJP in Sanjay Raut’s entire press conference

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस