प्रतिनिधी
मुंबई : मशिदींवरचे भोंगे उतरवायचे म्हटले, तर यांची हातभर फाटली आणि म्हणे यांनी बाबरी मशीद पाडली!!, अशा कठोर शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले. ते बुस्टर डोस सभेमध्ये बोलत होते.
While lowering the horns on the mosques, he broke his arm and said, “They demolished the Babri Masjid!”
बाबरी मशीद पाडण्यासंदर्भातला सगळा घटनाक्रम त्यांनी या सभेत विशद केला. बाबरी मशीद पाडण्याच्या वेळी हा कारसेवक देवेंद्र फडणवीस तिथे उपस्थित होता. पण शिवसेनेचा एकही नेता त्यावेळी उपस्थित नव्हता, असा घणाघाती हल्लाबोल फडणवीस यांनी केला.
आम्हाला प्रसिद्धी करता येत नाही आणि अनुशासन तोडता येत नाही म्हणून शिवसैनिक बाबरी मशीद पाडलेले श्रेय घेतात. पण बाबरी मशीन राभसेवकांनी आणि कारसेवकांनी पाडली आणि कल्याण सिंग यांनी राममंदिरासाठी आपले सरकार बलिदान केले, असे उद्गार फडणवीस यांनी काढले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर फडणवीसांनी एकापाठोपाठ एक हल्ले चढवले. त्याच वेळी आपण 14 तारखेनंतर म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर खऱ्या अर्थाने पोलखोल सभा घेणार आहोत, असे फडणवीस यांनी जाहीर केले. मुख्यमंत्र्यांचे हिंदुत्व म्हणजे घंटाधारी आणि गधाधारी असे मी म्हणालो होतो. पण मला एकाने फोन करून सांगितले रोज गधा आमच्या दारी असे त्यांचे हिंदुत्व आहे. ज्यांनी रामावर प्रश्न उपस्थित केले त्यांच्या मांडीला मांडी लावून ते सत्तेवर बसले आहेत आणि आज ते हिंदुत्वाच्या गप्पा मारत आहेत, असा टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना हाणला आहे. आता याबाबत शिवसेनेची नेमकी काय प्रतिक्रिया येते याची उत्सुकता आहे.