• Download App
    गुन्हे करताना फुगते छाती; पण कायद्याच्या कचाट्यात अडकताच एन्काऊंटरची वाटते भीती!!|While committing crime azam Khan and lalit patil were adamant, but after arrest they feared of encounters

    गुन्हे करताना फुगते छाती; पण कायद्याच्या कचाट्यात अडकताच एन्काऊंटरची वाटते भीती!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : गुन्हे करताना फुगवतात छाती; पण कायद्याच्या कचाट्यात अडकताच वाटते एन्काऊंटरची भीती!!, अशीच सगळ्या गुंड – गुन्हेगारांची आणि त्यांच्या चेले चपाट्यांची अवस्था होते. विशेषतः उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या राजवटीत आणि महाराष्ट्रात भाजपच्या प्रभावाच्या राजवटीत गुंड माफियांना ही भीती सारखे भेडसावते.While committing crime azam Khan and lalit patil were adamant, but after arrest they feared of encounters

    उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे नेते आजम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आजम खान याच्या बनावट जन्मदाखला प्रकरणात स्वतः आजम खान, अब्दुल्ला आजम खान आणि त्याची आई तंजीम फातिमा यांना प्रत्येकी 7 वर्षांची सजा कोर्टाने फर्मावली. सुप्रीम कोर्टातूनही त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांची रवानगी थेट तुरुंगात झाली. त्यांना त्यांचे स्वतःचे गाव रामपूरच्या जेलमध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीतापूर जेलमध्ये हलविले. त्यावेळी आजम खान यांनी आपला एन्काऊंटर होण्याची भीती व्यक्त केली.



    हे तेच आजम खान आहेत, ज्यांनी लोकसभेत रमादेवी या सभापतींच्या आसनावर बसलेल्या असताना त्यांचा अपमान केला होता. रामपूर सारख्या गावात गुन्हेगारीचे जाळे विणण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. तब्बल 30 ते 35 वर्षे आजम खान यांची दहशत रामपूर मध्ये राहिली. मुलायम सिंह यादव यांच्या छत्रछायेखाली आजम खान यांनी स्वतःचे गुन्हेगारी साम्राज्य वाढविले. त्यात पत्नी तंजीम फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला आजम यांनाही सामील करून घेतले. स्वतः लोकसभेत खासदार असताना त्यांनी समाजवादी पार्टीतूनच फातिमा तंजीम यांना राज्यसभेचे खासदार केले आणि आपल्या मुलाला रामपूर जिल्ह्यातल्याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आणले.

    या आमदारकीच्या निवडणुकीतच त्यांनी अब्दुल्ला आजम याचे खोटे जन्म प्रमाणपत्र सादर केले. अब्दुल्लाचा जन्म 1 जानेवारी 1993 चा असताना बनावट जन्म प्रमाणपत्र वर त्याची तारीख 30 सप्टेंबर 1990 अशी दाखविली, इतकेच नाही तर दोन जन्म प्रमाणपत्रांवर त्याचे जन्मस्थान रामपूर आणि लखनऊ असे वेगवेगळे दाखविले. त्यामुळे त्याची निवडणूक तर रद्द ठरलीच, पण बनावट जन्म प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल लखनऊ हायकोर्टाने या तिघांनाही प्रत्येकी 7 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

    वेगवेगळे गुन्हे करताना आजम खान, तंजीम फातिमा आणि अब्दुल्ला आजम खान हे सर्व ठिकाणी प्रतिष्ठितपणे हिंडत होते. आजम खान आणि अब्दुल्ला छाती फुगवून आपला समाजवादी पार्टीचा वारसा सांगत होते, पण हायकोर्टाने शिक्षा फर्मावून कायद्याच्या कचाट्यात अडकवल्यानंतर मात्र आजम खान यांना एन्काऊंटरची भीती वाटायला लागली. रामपूर मधून सीतापूर जेलमध्ये त्यांना नेले जात असताना त्यांनी आपल्या एन्काऊंटरची भीती व्यक्त केली होती. पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. आजम खान यांना सुरक्षितपणे सीतापूर जेलमध्ये पोचविण्यात आले.

     ललित पाटीलच्या नातेवाईकांना एन्काऊंटरची भीती

    जे आजम खान यांचे, तेच ललित पाटील या ड्रग्स तस्कराचे. दोन खोल्यांच्या घरातून तब्बल 300 कोटी रुपयांची संपत्ती जमवेपर्यंत ललित पाटील वेगवेगळे गुन्हे करत होता. ड्रग्सचा कारखाना उभारण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. हे सगळे गेली सात – आठ वर्षे निर्धोकपणे सुरू होते. त्यावेळी ललित पाटील किंवा त्याच्या नातेवाईकांना ललितच्या एन्काऊंटरची भीती वाटली नाही. दोन खोल्यांपासून सुरू करून 300 कोटी रुपयांची मालमत्ता जमा करेपर्यंत त्याची मजल कशी गेली?? आठ किलो सोने खरेदी करण्याची क्षमता त्याच्यात कशी आली??, हे प्रश्न खुद्द त्याला आणि त्याच्या नातेवाईकांना पडले नाहीत, पण पोलिसांनी त्याला कायद्याच्या कचाट्यात अडकवून जेलमध्ये घातल्याबरोबर ललित पाटीलच्या नातेवाईकांना त्याच्या एनकाउंटरची भीती वाटायला लागली. इतकेच नाही, तर ललित पाटीलच्या अवतीभवती असणाऱ्यांना भर पत्रकार परिषदेत रडू कोसळायला लागले. त्याच बरोबर नाशिक मध्ये येऊन ड्रग्स विरोधात मोर्चे काढावेसे वाटले.

    ललित पाटीलला पोलीस नाशिक मध्ये घेऊन आले शिंदे पळसे जिल्ह्याच्या कारखान्याची झडपी घेतली त्याच्या वेगवेगळ्या मालमत्ता शोधून काढण्यासाठी बुरखा घालून फिरवले. यातून यामुळे ललित पाटील भोवतीच्या लोकांना तीव्र दुःख झाले आहे. पण ललित पाटील सगळे गुन्हे करत असताना हेच त्याला पाठीवर हात ठेवून लढ म्हणत होते. त्यामुळे त्याची छाती फुगली होती आणि कायद्याच्या कचाट्यात अडकताच ललित पाटीलच्या नातेवाईकांना त्याच्या एनकाउंटरची भीती वाटली!!

    While committing crime azam Khan and lalit patil were adamant, but after arrest they feared of encounters

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!