Wednesday, 7 May 2025
  • Download App
    कोल्हापूरचा कोणता पैलवान जास्तीत जास्त अपक्षांना खेचणार??Which wrestler from Kolhapur will attract maximum number of independents?

    राज्यसभा निवडणूक : कोल्हापूरचा कोणता पैलवान जास्तीत जास्त अपक्षांना खेचणार??

    प्रतिनिधी

    मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने तिस-या उमेदवाराची घोषणा केल्यामुळे आता ही निवडणूक चुरशीची होणार आहे. कारण आता 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात असल्यामुळे एका उमेदवाराचा पत्ता कट होणार हे निश्चित आहे. पण यापैकी कोणत्या उमेदवाराला घरी बसावे लागणार हे आता सर्वस्वी अपक्ष आमदारांच्या हातात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच कोल्हापूरचा नेमका कोणता पैलवान जास्तीत जास्त अपक्षांना आपल्या बाजूने खेचणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. शिवसेनेकडून संजय पवार आणि भाजपकडून धनंजय महाडिक दोन कोल्हापूरचे पैलवान मैदानात आहेत. दोघांची स्वतःची ताकद आणि पक्षांची ताकद तुल्यबळ आहे. Which wrestler from Kolhapur will attract maximum number of independents?

    शिवसेनेकडून संजय राऊत, संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल, काँग्रेसकडून उत्तर प्रदेशातून आलेले इम्रान प्रतापगडी तर भाजपकडून पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता राज्यसभा निवडणुकीसाठी लागणा-या मतांच्या गणितानुसार, भाजपचे दोन, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकेक उमेदवारांना पहिल्या फटक्यातील 42 मते मिळून राज्यसभेत सहज एंट्री मिळेल.


    राज्यसभा निवडणूक : पियुष गोयल, डॉ. अनिल बोंडेंना भाजपची उमेदवारी; विनय सहस्रबुद्धेंना वगळले; तिसऱ्या जागेचा सस्पेन्स कायम


    – महाविकास आघाडीवर भाजपची बाजी

    महाविकास आघाडीचे तीन पक्षांची मिळून 27 मते शिल्लक राहतात, तर भाजपची 29 मते शिल्लक राहतात. पण यामध्ये सगळ्यात मोठे गेम चेंजर ठरू शकतात ते अपक्ष आमदार. कारण अपक्ष आणि इतर पक्षांच्या आमदारांची 16 मते आहेत. अपक्ष आमदार हे कुठल्याच पक्षाचे नसल्याने उमेदवाराला मत देताना त्यांच्यावर कुठलेही बंधन नसते. त्यामुळे आता सहावी जागा कोणाला द्यायची हे थोडक्यात अपक्ष आमदारांच्या हातात असणार आहे.

    कोणाची नाचक्की होणार?

    ज्याअर्थी भाजपने या निवडणुकीसाठी तिस-या उमेदवाराला रिंगणात उतरवले, त्याअर्थी भाजपने या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जोरदार तयारी केली असणार, यात कुठलीही शंका नाही. उमेदवार उभा करुन तो निवडून आला नाही तर पक्षाची मोठी नाचक्की होते. त्यामुळे या नाचक्कीला कोणत्या पक्षाला सामोरे जावे लागणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

    हे पक्षही ठरवणार भवितव्य

    अपक्षांसोबतच इतर पक्ष ज्यामध्ये बहुजन विकास आघाडी, भारिप बगुजन महासंघ, समाजवादी पक्ष, शेकाप, एमआयएम, कम्युनिस्ट पक्ष, मनसे या संख्याबळ कमी असणा-या पक्षांची मतेही सहाव्या जागेसाठी महत्वाचे ठरणार असल्याची चर्चा आहे.

    अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांशी मी स्वतः बोलतो आहे. भाजपचे केंद्रीय नेते देखील काही नेत्यांशी बोलले आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचा अर्थ भाजप सहाव्या जागेसाठी मजबूत फिल्डिंग लावून मैदानात उतरला आहे, असे दिसून येत आहे.

    Which wrestler from Kolhapur will attract maximum number of independents?

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर भव्य चित्रपट निर्मिती; चौंडी मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत निर्णय!!

    Devendra Fadnavis आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस