विशेष प्रतिनिधी
पुणे : बड्या बापाच्या बेट्याने कल्याणी नगर मध्ये पोर्शे कार भयानक वेगात चालवून दोघा इंजिनियर्स बळी घेतले, पण हे बळी घेणाऱ्या वेदांत अग्रवाल याला वाचवियला गेलेले आमदार कोणत्या पवारांचे होते??, असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अग्रवाल – पवार कनेक्शनवर नेमकेपणाने बोट ठेवले. Which Pawar MLA saved Vedant Agarwal
वेदांत अग्रवाल याला बालहक्क न्यायालयाने 15 तासांतच जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या या निर्णयाने सोशल मीडियातून संतापाची लाट उसळली. त्यानंतर या अपघात प्रकरणी बालहक्क न्यायालयाने अल्पवयीन आरोपीबाबत आपलाच निर्णय बुधवारी बदलला. विधीसंघर्षग्रस्त आरोपीला बालहक्क न्यायालायने 14 दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले.
मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुणे अपघातात आरोपीच्या मदतीसाठी गेलेला आमदार कोणत्या पवारांचा आहे??, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारून नानांनी अग्रवाल – पवार कनेक्शनवर बोट ठेवले.
नाना पटोले म्हणाले की, पुणे अपघातात आरोपीच्या मदतीसाठी गेलेले आमदार कोणत्या पवारांचा आहेत?? हे मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट करावे. यासंदर्भात काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांना एक पत्र देण्यात येणार असल्याचेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.
– सुनील टिंगरे अजितदादा गटाचे
दरम्यान, पुण्यातील कल्याणीनगर येथे रविवारी रात्री पोर्श कारच्या अपघातातील मुख्य आरोपी वेदांत अग्रवाल याचा जामीन फेटाळत बाल हक्क न्यायालयाने 14 दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले. मात्र ज्या दिवशी अपघात घडला, त्यावेळी पुण्यातील वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. सुनील टिंगरे हे अजित पवार गटाचे आहेत. असे असतानाही नाना पटोले यांनी बिल्डर अग्रवाल याच्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करणारे आमदार हा कोणत्या पवारांचे आहेत??, असा खोचक सवाल करून नानांनी पवार कनेक्शनवर नेमके बोट ठेवले.