वृत्तसंस्था
कराड : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे गडकरी, वारकरी आणि धारकरी यासह महाराष्ट्राचे अत्याधुनिक शिल्पकार आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्यांची स्तुती केली.When the NCP MP Praises Nitin Gadkari …
येथील प्रीतिसंगम परिसरात आयोजित कार्यक्रमासाठी नितीन गडकरी आले होते. त्यावेळी खासदार पाटील बोलत होते.ते म्हणाले, पुण्यातील कार्यक्रमात गडकरी यांनी महाराष्ट्राच्या प्रगती कशा प्रकारे करता येईल, याचा सुंदर आलेख मांडला. तो खरोखरच आधुनिक महाराष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग आहे.
रस्ते, पूल आणि विविध प्रकल्पातून राज्य कसे घडविले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कोणताही प्रकल्प त्यांच्या मनात रुजला की ते साकारतात. विशेष म्हणजे त्यासाठी ते पैसाही उभारतात, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. प्रामणिकता आणि सचोटी असली की कोणतीही कामे मार्गी लागतात, याचे ते उत्तम उदाहरण आहे, असे पाटील यांनी सांगितले.
नागपूर येथे प्रशासकीय अधिकारी असताना मला नागपूरचा कायापालट करण्यासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन अनमोल होते. त्यामुळे बगीचे, उद्याने आणि कारंजे असलेले शहर म्हणून नागपूर उदयास आले.
- नितीन गडकरी महाराष्ट्राचे अत्याधुनिक शिल्पकार
- गडकरी, वारकरी आणि धारकरी
- महाराष्ट्र देशात नंबर एक घडविण्याचा योजना
- प्रकल्प मनात रुजला की ते साकारतात
- प्रामणिकता आणि सचोटीचे ते उत्तम उदाहरण
- पुण्यातील गडकरी यांचे भाषण प्रगतीचा मार्ग
- नागपूरला अधिकारी असताना अनमोल मार्गदर्शन
- माझा आणि गडकरी यांचा २५ वर्षांचा सहवास
When the NCP MP Praises Nitin Gadkari …
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेतून परतल्यावर पंतप्रधान मोदी थेट पोचले विस्टा प्रोजेक्ट पाहायला; एक तास घेतला आढावा
- “भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा, अन्यथा जलसमाधी”; अयोध्येतील धर्मसंसदेत संत परमहंस यांची घोषणा
- महाराष्ट्र व गुजरातला परतीचा पाऊस झोडपणार, आज, उद्या मुसळधार कोसळणार; शास्त्रज्ञाचा इशारा
- SARTHI PUNE : छत्रपती संभाजीराजे ‘सारथी’ चे सारथी ! यूपीएससी निकालातून ‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित ; संभाजीराजेंच ट्विट