विशेष प्रतिनिधी
मुंबई : कृषी कायदे संसदेत संमत होत असताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का?, असा खोचक सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्र बंद विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याच वेळी शिवसेनेमध्ये आता बंद करायचा दम राहिलेला नाही. त्यामुळे पोलीस आपल्या दंडुक्याच्या बळावर दुकाने बंद करायला भाग पाडत आहेत, असा आरोप मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मुंबईत केला आहे. When the Agriculture Act was passed, was the MP of Mahavikas Aghadi wearing a tail ?; MNS aggressive against closure
संसदेत कृषी कायदे संमत होताना पवारसाहेब का अनुपस्थित राहिले?, त्या वेळी संसदेत त्यांनी कृषी कायद्यांना विरोध का नाही केला?, शिवसेनेच्या खासदारांनी कृषी कारखान्यांना का विरोध केला नाही?, अशा आशयाचे सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केले आहेत.
सोलापुरात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत रस्त्यांवर टायर जाळून बंदला सुरुवात केली आहे. रत्नागिरीत काही व्यापाऱ्यांनी बंद करायला नकार देऊन दुकाने सुरू ठेवली आहेत, तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स बंदला विरोध आहे. औरंगाबाद, नाशिक, अमरावती, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर आदी बहुतेक शहरांमधली मार्केट यार्ड बंद आहेत. पण दुकाने सुरू आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंदला विरोध केला आहे. दादागिरी करून जर कोणी बंद करायला लावला तर मनसे रस्त्यावर उतरून दुकाने उघडेल, असा इशारा देखील मनसेच्या नेत्यांनी दिला आहे.
तर दुसरीकडे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महा विकास आघाडीच्या नेत्यांवर तोफ डागली आहे यांचा चंदा गोळा करण्यासाठी महाराष्ट्र बंद करण्यात येतो आहे. पण तोफ असेल तो असेल, असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे.
When the Agriculture Act was passed, was the MP of Mahavikas Aghadi wearing a tail ?; MNS aggressive against closure
महत्त्वाच्या बातम्या
- माझ्या कोकणवासीयांना साद, हातात हात गुंफून विकासाच्या यात्रेत सहभागी होऊयात! – नारायण राणे
- वसुली म्हटल्यावर सरकारचा ‘ससा’, शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’; मदत तर त्याहून संतापजनक, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- भाजप विरोधात भाषणे करून ममता बॅनर्जी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसताहेत; अधीर रंजन चौधरी यांचे अचूक शरसंधान!!
- दुर्गा सन्मान : महिला आणि मुलींच्या संरक्षण – सक्षमीकरणात कायमच आघाडीवर!!, वैशाली केनेकर
- लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपींना अटक का करत नाही?, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल