विशेष प्रतिनिधी
मुंबई : व्हॉट्सॲप ग्रुपवर एखाद्या सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्यास त्यासाठी ॲडमिन जबाबदार असू शकत नाही, असा निकाल उच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान दिला. सदस्याने वादग्रस्त पोस्ट ॲडमिनशी संगनमत करून टाकली नसेल; तर त्या पोस्टसाठी ॲडमिनला जबाबदार धरता येणार नाही. whattapp group admin not responsible for post on group
न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि न्यायमूर्ती एम. ए. बोरकर यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. त्या वेळी ग्रुप ॲडमिन केवळ सदस्यांना ॲड आणि रिमूव्ह करू शकतो; मात्र त्यांच्या पोस्टसाठी तो जबाबदार ठरू शकत नाही. कायदेशीर तरतुदीमध्ये असा उल्लेख नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.