वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कालपर्यंत स्वतःला महाविकास आघाडीचा चौकीदार म्हणवून घेणाऱ्या संजय राऊत यांचे आज सुरू बदलले असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही चालले आहे, तो त्यांचा अंतर्गत मामला आहे, असे संजय राऊत यांनी आज त्यांच्या नियमित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.Whatever is going on in NCP is their internal matter; Sanjay Raut’s changed tune
उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन काल दोन तास चर्चा केली. त्यानंतर संजय राऊत हे देखील शरद पवारांना भेटले होते. त्या संदर्भात आज पत्रकार परिषदेत त्यांना विचारले असता संजय राऊत म्हणाले, शरद पवार यांच्याशी माझ्या नेहमीच बैठका होत असतात. अदानी यांची भेट झाल्यानंतर मी जरी शरद पवारांना भेटलो असलो तरी अदानी भेटीचा आणि माझ्या भेटीचा काही संबंध नाही. पवारांबरोबरच्या भेटीत राजकीय चर्चा निश्चित झाली पण अदानी विषयावर चर्चा झाली नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
त्याचवेळी संजय राऊत यांनी अजितदादांच्या कथेत बंडा विषयी देखील भाष्य केले. राष्ट्रवादीत सध्या जे काही सुरू आहे, तो त्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे, असे सांगून संजय राऊत यांनी आपले सूर बदलल्याचा संकेत दिला. कालच संजय राऊत आपण महाविकास आघाडीचे चौकीदार आहोत, असे म्हणत होते. पण प्रत्यक्षात त्यांचा आणि अजितदादांचा वाद रंगला होता. ज्यांचे मुखपत्र आहे, त्याच पक्षाविषयी त्यांनी बोलावे असे अजितदादांनी संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांना ठणकावले होते.
त्यावरूनच संजय राऊत यांनी आपण महाविकास आघाडीचे चौकीदार आहोत. आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही. आपण फक्त शरद पवारांचे ऐकतो. त्यामुळे माझ्यावर खापर फोडण्याचे कारण काय??, असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. मात्र आजच्या पत्रकार परिषदेत, संजय राऊत यांनी राष्ट्रवादीत जे काही चालू आहे, तो त्यांचा अंतर्गत मामला आहे, असे सांगून आपले सूर बदलल्याचे संकेत दिले आहेत.
Whatever is going on in NCP is their internal matter; Sanjay Raut’s changed tune
महत्वाच्या बातम्या
- अतिक अहमदच्या कबरीवर तिरंगा ठेवणाऱ्या काँग्रेस नेत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
- ट्विटरने कोणालाही सोडले नाही! राहुल गांधी, योगींपासून ते शाहरुख-सलमानपर्यंत सर्वांच्या हटवल्या लेगसी ब्ल्यू टिक्स
- भारताच्या लोकसंख्येवर चीनने म्हटले- संख्या नव्हे, गुणवत्ता महत्त्वाची, चीनचे परराष्ट्र मंत्रालय म्हणाले- आमचे 90 कोटी लोक कामाचे, त्यांच्यात टॅलेंटही आहे
- कॉंग्रेसने इतिहास पळवला, स्वत:ला हवा तसा लिहून घेतला; सावरकर स्मारकातून मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल