धास्तीच्या बैठका, तोंडात जोर
विधान परिषदेचा लागला, सगळ्यांनाच घोर
उडाली धावपळ, नेत्यांच्या गाठीभेटी
विश्वास ना कोणावर घाताचीच भीती!!
अपक्षांना न दिली किंमत, न दिला निधी
एकेका मतासाठी, काढताहेत नाकदुरी
पराभवाच्या भीतीचा, पोटात आला गोळा
तिन्ही पक्षांच्या मतांवर, एकमेकांचाच डोळा!!
तिघे मिळून भाजपवर सोडतात वाग्बाण
“आपलेच” सांभाळताना फुटला यांना घाम
नाना म्हणे, अजित म्हणे, चमत्कार घडेल!!
पण उद्धवामनी धास्ती “काका” काय करेल??
What will scary “uncle” do to everyone?
व्यंगचित्रे : सुमंत बिवलकर