विशेष प्रतिनिधी
मुबंई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांना काल एक पत्र पाठवले होते. या नंतर राजकीय वर्तुळात बरीच खळबळ उडाली होती. संजय राऊत यांनी भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 500 ते 700 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा दावा करत हा घोटाळाही किरीट सोमय्या यांनी उघड करावा असे म्हटले आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत हा घोटाळा झाला असून ईडी, सीबीआय चौकशीसाठी सोमायांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन संजय राऊत यांनी या पत्राद्वारे केले होते. तसेच या पत्रातील माहितीच्या आधारे सोमय्या ईडीला घोटाळ्याच्या चौकशीसाठी पाठपुरावा करण्यासाठी मदत देखील करतील अशी अपेक्षा देखील संजय राऊत यांनी या पत्रातून व्यक्त केली होती.
What was Kirit Somaiya’s reply to Sanjay Raut’s letter?
या पत्राला उत्तर देत किरीट सोमय्या यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या प्रकरणात बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, मला कळत नाहीये की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते संजय राऊत यांचे मी आभार मानावेत की आश्चर्य व्यक्त करावं. त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे की उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास व्यक्त केला आहे हे कळत नाहीये.
संजय राऊतांचं थेट सोमय्यांना पत्र! ‘तो’ 500 कोटींचा घोटाळा सोमय्यांनी उघड करा’
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर राऊत यांनी ठाकरे सरकारच्या कार्यक्षमतेवर चिंता व्यक्त केली आहे. कारण आजवर त्यांनी परमजितसिंह यांना शोधू शकले नाहीत. मी पुन्हा शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो की त्यांनी आपल्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक केले आहे. अशी खोचक प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
What was Kirit Somaiya’s reply to Sanjay Raut’s letter?
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष्य डोनाल्ड ट्रम्प स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करणार, ‘ट्रुथ सोशल’ असणार नाव
- नवाब मलिकांचे जस्मिन वानखेडे यांच्यावर आरोप , मनसे झाली आक्रमक
- Farmers Protest : गाझीपूर बॉर्डर राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी केला खुला, राकेश टिकैत म्हणाले – आम्ही बंदच कधी केला होता!
- NCB Raid : अनन्या पांडेच्या घरावर एनसीबीचा छापा, आर्यन खान प्रकरणाशी काही संबंध आहे का? जाणून घ्या सविस्तर
- भारताच्या 100 कोटी लसीकरणाची जागतिक आरोग्य संघटनेकडून विशेष दखल
- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २५ तारखेपासून व्यापक लसीकरण मोहीम ; उदय सामंत यांची घोषणा, दिल्या आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना