प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांची २२ मे रोजी ईडी कार्यालयात चौकशी झाली. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनॅन्शियल सर्व्हिसेस (आयएल अँड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी जयंत पाटील यांना समन्स बजावण्यात आले होतं. What is the reason why Jayant Patal is afraid of ED inquiry?
आयएल अँड एफएसकडून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी जयंत पाटील यांची ईडीने चौकशी केली. पण सत्ताधारी भाजपाने जयंत पाटील यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लावला असल्याचा आरोप करत पाटील त्यांचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले.
मात्र जयंत पाटील यांच्या चौकशीबाबत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मूळात केंद्रीय यंत्रणा असतील अथवा राज्याच्या यंत्रणा असतील, त्या त्यांचे काम करत असतात. त्यांच्याकडे काही संशयास्पद माहिती असेल, अथवा एखादे प्रकरण असेल म्हणून त्यांनी पाटील यांना चौकशीसाठी बोलावले असेल. जर जयंत पाटलांचा या खटल्याशी (आयएल अँड एफएस) काही संबंध नसेल तर त्यांनी घाबरण्याचे कारण नाही.
प्रकरण काय?
आयएल अँड एफएसवर कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याचा आरोप आहे. ईडीने याप्रकरणी आयएल अँड एफएसचे दोन माजी लेखापाल व त्यांचे सहाय्यक यांच्याशी संबंधित ठिकाणांवर गेल्या आठवड्यात शोध मोहिम राबवली होती.
दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०१९ मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर याप्रकरणी चौकशीला सुरुवात केली होती. यात आता जयंत पाटलांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी ऑगस्ट २०१९ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती.
What is the reason why Jayant Patal is afraid of ED inquiry?
महत्वाच्या बातम्या
- पुणे महानगरपालिकेचं पुरोगामी पाऊल; तृतीयपंथीयांना सेवेत सामावून घेतलं जाणार
- बिग बॉस मध्ये गेल्यावर भल्याभल्यांची इमेज खराब होते माझी मात्र सुधारली.. तृप्ती देसाई..
- देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच सावरकर जयंतीचा आठवडाभर प्रचंड धुमधडाका!!
- भाजपा २०२४ च्या निवडणुकीपूर्वी ओडिशातील एक कोटी कुटुंबांशी साधणार संपर्क