• Download App
    संभाजीराजे यांच्यासमवेत आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रकाश आंबेडकरांचा राजकीय होरा काय…?? what is the politics behind MP sambhaji raje - prakash ambedkar duo in maratha agitation

    संभाजीराजे यांच्यासमवेत आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रकाश आंबेडकरांचा राजकीय होरा काय…??

    नाशिक – मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांनी जो एल्गार पुकारला आहे, त्यामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. पण यामागे त्यांचा राजकीय होरा काय आहे, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जाऊ लागला आहे. what is the politics behind MP sambhaji raje – prakash ambedkar duo in maratha agitation

    शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज असलेल्या छत्रपती संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी जो लढा उभा केला आहे, त्याला पाठिंबा देऊन सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यासाठी महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज उद्या कोल्हापुरात जाणार आहेत.

    ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय दिला. देशात सर्वात पहिल्यांदा आरक्षण लागू केले. बाबासाहेबांना सर्वार्थाने मदत केली ती शाहू महाराजांनी. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी शाहू महाराजांनी केलेल्या क्रांतिकारी कार्याचा गौरव केला आहे. अनेक अर्थांनी हा पाठिंबा अभूतपूर्व असणार आहे. महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशात हा सामाजिक समतेचा आणि एकोप्याचा संदेश जाईल, अशा भावना वंचित बहुजन आघाडीतर्फे व्यक्त करण्यात आल्या आहेत.

    पण यामागे फक्त वर उल्लेख केलेला सामाजिक संदेश आहे, की काही राजकीय होरा देखील त्या पाठीमागे दडला आहे, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

    मराठा आंदोलनाने आता बिगर राजकीय ते आता पूर्ण राजकीय असे वळण घेतले आहे. प्रत्येक पक्षाचे नेते यात राजकारण आणू नका असे सांगत आपले राजकारण साधून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. संभाजीराजे यांची राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत संपत आली आहे. त्यांचा कल आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ते कोल्हापूरातून राष्ट्रवादीचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार आहेत.



    त्यांच्या समवेत प्रकाश आंबेडकर हे व्यासपीठ शेअर करून राष्ट्रवादीशी तर राजकीय जवळीक साधू इच्छित नाहीत ना, असा सवाल उपस्थित होतो आहे. प्रकाश आंबेडकर हे गेल्या काही वर्षांमध्ये उघडपणे शरद पवारांवर टीका करीत आले असले, तरी त्यांनी १९९६ मध्ये एकदा शरद पवारांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसबरोबर जाऊन एकदा खासदारकीची निवडणूक जिंकली आहे. त्यावेळी प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली होती.

    मध्ये बरीच वर्षे गेली आहेत. आता प्रकाश आंबेडकरांची राजकीय महत्त्वाकांक्षा पुन्हा जागृत झालेली दिसू लागली आहे. नुसत्या वंचित आघाडीचे नेतृत्व करून भागणार नाही, तर लोकप्रतिनिधित्व पुन्हा मिळाले पाहिजे, असा त्यामागचा विचार असू शकतो. या साठी संभाजी राजे हे शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातला राजकीय पूल होऊ शकतात, असे मानण्यास वाव आहे. कदाचित प्रकाश आंबेडकरांच्या उद्याच्या आंदोलनात सहभागी होण्याचे राजकीय रहस्य यात दड़ले असावे.

    what is the politics behind MP sambhaji raje – prakash ambedkar duo in maratha agitation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस