नाशिक : शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त पवार काका – पुतणे एकत्र येणार पवार हळूच मागच्या दाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वतःचीच राष्ट्रवादी काँग्रेस विलीन करून टाकणार अजित पवारांकडे पक्षाची सूत्रे सोपवणार इथपासून ते अजित पवारांची शरद पवार तडजोड करायला तयार आहेत, पण अजित पवारांनी भाजपची साथ सोडली पाहिजे अशी त्यांची अट आहे, इथपर्यंतच्या अटकळी सगळ्या माध्यमांनी बांधून झाल्या, पण प्रत्यक्षात काका – पुतणे वाढदिवसाच्या स्नेहभोजना व्यतिरिक्त एकत्र आल्याचे दिसले नाही. Pawar uncle and nephews
अगदी राजकीय गरज असली तरी सुद्धा पवार काका – पुतणे एकत्र येण्याची दाट शक्यताच नाही, कारण पवार काका – पुतणयांचे एकत्र येणे किंवा फुटणे हे मुळातच त्या दोघांच्या वैयक्तिक इच्छेवर अवलंबून राहणे शिल्लकच राहिलेले नाही.
नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सगळेच पक्ष स्वतंत्र लढले. त्यामुळे पवार काका फुटाणे यांचे दोन्ही पक्ष फार कुठे एकत्र येऊन लढल्याचे चित्र दिसले नाही. स्थानिक पातळीवर आपापल्या सोयीनुसार काका – पुतण्यांच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांशी जुळवून घेतले किंवा ते एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. त्यापलीकडे पवार काका – पुतण्यांच्या एकत्रीकरणाचे कुठले चित्र दिसून आले नाही.
– कार्यकर्त्यांची इच्छा
पण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र पवार काका – पुतण्यांच्या पक्षांनी एकमेकांशी जुळवून घ्यावे त्यामुळे थोडीफार ताकद निर्माण होईल आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका तुलनेने सोप्या होतील, अशी प्रामाणिक भावना दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते.
– पण भाजपची इच्छा काय??
पण पवार काका – पुतणे एकत्र येणे हे फक्त दोघांच्या इच्छेवर अवलंबूनच राहिलेले नाही. तिथे सत्ताधारी असलेल्या बळकट भाजपची काय भावना आहे, याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण भाजपचे पवार काका पुतण्यांवरचे राजकीय अवलंबित्व संपुष्टात आले आहे, पण पवार पुतण्याचे राजकीय अस्तित्व मात्र भाजपवर अवलंबून राहणे वाढले आहे.
पवार काका – पुतण्यांची ताकद पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांमध्ये आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये किंबहुना तेवढ्यापुरतीच मर्यादित आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये पवार काका – पुतणे एक व्हावेत, अशी दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा असली, तरी भाजपच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची तशी बिलकुल इच्छा नाही. कारण त्यातून भाजपला थोडेफार सुद्धा आव्हान निर्माण झालेले चालणार नाही. म्हणून सत्ताधारी बळकट भाजपचे नेते पवार काका – पुतण्यांमध्ये जिथे जितकी मेख किंवा पाचर मारता येईल तितकी मारून ठेवण्याचे काम करतील आणि भाजपच्या सत्तेच्या वळचणीला बसून राहण्याखेरीच पर्याय नसल्यामुळे अजित पवारांना भाजपची पाचर मारण्याची कृती सहन करावी लागेल. अन्यथा भाजप अजितदादांना वेगळ्या मार्गाने अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही.
– अजितदादांचे हात दगडाखाली
या सगळ्या प्रक्रियेत भाजपचे नेते उघडपणे काहीच बोलणार नाहीत, पण राजकीय कृती केल्याशिवाय मात्र राहणार नाहीत. पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात खुद्द अजित पवारांचे हात दगडाखाली अडकलेत. ते भाजप सहजासहजी दगडाखालून सोडवून देणार नाही. पवार काका – पुतण्यांनी एक व्हावे आणि त्यांनी पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये भाजपला आव्हान निर्माण करावे, अशी स्थितीच भाजपचे नेते निर्माण होऊ देण्याची शक्यता नाही. पण काका – पुतण्यांनी तशी स्थिती निर्माण करायचा रेटून प्रयत्न केलाच, तर भाजपचे नेते अजित पवारांना त्याची राजकीय किंमत चुकवायला लावतील. हीच शक्यता मोठी आणि दाट आहे.
What if Pawar uncle and nephews push to get together?
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार- मुंबई लुटणाऱ्यांनी अमित शहांवर बोलू नये; स्वत:चे पायपुसणे करून घेणाऱ्यांना टीका करायचा अधिकार नाही
- Delhi HC : इंडिगो संकटावर दिल्ली हायकोर्टाने सरकारला फटकारले; ₹4 हजारांचे तिकीट ₹30 हजारपांर्यंत कसे पोहोचले; तुम्हीच ही परिस्थिती निर्माण होऊ दिली
- पुतिन यांच्या भारत दौऱ्यानंतर आठवड्याच्या आतच ट्रम्पचा मोदींना फोन; जागतिक सामरिक सहकार्यावर चर्चा!!
- कायदा खुंटीवर टांगून ममतांच्या TMC खासदाराने संसद परिसरात ओढली इ सिगरेट; वर त्याचे केले समर्थन!!