• Download App
    दोन वर्षांचा हिशेब काय मागता? सत्तर वर्षांचा हिशोब देऊ ; रुपाली चाकणकरांनी चित्रा वाघ यांच्यावर साधला निशाणाWhat do you ask for a two year account? Give an account of seventy years; Rupali Chakankar aims at Chitra Wagh

    दोन वर्षांचा हिशेब काय मागता? सत्तर वर्षांचा हिशोब देऊ ; रुपाली चाकणकरांनी चित्रा वाघ यांच्यावर साधला निशाणा

    महाविकास आघाडीचे सरकार आज पडेल, उद्या पडेल, अशी स्वप्ने विरोधकांना रोजच पडत आहेत.अस देखील रुपाली चाकणकर म्हणाल्या.What do you ask for a two year account? Give an account of seventy years; Rupali Chakankar aims at Chitra Wagh


    विशेष प्रतिनिधी

    कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर कर्जत जामखेड येथील एका कार्यक्रमात बोलत होत्या.यावेळी रुपाली चाकणकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.


    चित्रा वाघ यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचं भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निश्चित


    चाकणकर म्हणाल्या की , ज्यांच्या नवऱ्याने लाच खाल्ली व त्यांना पक्ष सोडावा लागला, त्या आज आम्हाला दोन वर्षांचा हिशेब मागत आहेत! दोन वर्षांचा हिशेब काय मागता? सत्तर वर्षांचा हिशोब देऊ; मात्र भ्रष्टाचाऱ्यायांनी आम्हाला हिशेब मागू नये, असा टोमणा त्यांनी चित्रा वाघ यांना लगावला.

    विरोधक जातीपातीचे राजकारण करून समाजात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आज पडेल, उद्या पडेल, अशी स्वप्ने विरोधकांना रोजच पडत आहेत.अस देखील रुपाली चाकणकर म्हणाल्या.

    ज्यांना माहीतच नाही की भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले , त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला जातो. जो जास्त खोटे बोलेल, त्यालादेखील पद्मश्री पुरस्कार दिला जाईल असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

    What do you ask for a two year account? Give an account of seventy years; Rupali Chakankar aims at Chitra Wagh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा